स्वच्छ दात केवळ आपले सौंदर्यच खुलवत नाहीत तर तुम्हाला दातांच्या समस्येपासून दूर ठेवतात. काही लोकांच्या दातांमध्ये काळे डाग असता. त्याला किड लागणे असे म्हटले जाते. अशामुळे तुमचा दात पोकळ होत जातो. खरंतर कॅवेटिजची काही कारणे आहेत. दात स्वच्छ नसणे, बॅक्टेरियल इंन्फेक्शन, गोड पदार्थांचे अधिक सेवन करणे, हेल्थ संबंधित काही समस्या अशी काही कारणे आहेत. दातातील किड दूर करण्यासाठी हे पदार्थ कामी येतील.
-लवंग
लवंगामध्ये कॅव्हिटीच नव्हे तर ओरल समस्यांपासून दूर ठेवण्याचे गुणधर्म असतात. यामधील अँन्टी बॅक्टेरियल गुण दुखमे कमी करण्यास मदत करतात. लवंगाच्या तेलाचा वापर केल्याने किड लागण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.
-लसूण
भारतीय किचनमध्ये लसूण पदार्थाची चवच नव्हे तर आरोग्यासाठी फायदेशीर असते. लसणात अँन्टी फंगल आणि अँन्टी बॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे दात किडण्याच्या समस्येपासून दूर राहतात.
-मीठाचे पाणी
दात किडणे किंवा दुखीपासून आराम मिळण्यासाठी मीठाचे पाणी तुमच्या कामी येईल. तोंडातील बॅक्टेरिया यामुळे दूर होईल. मीठाचे पाणी तोंडातील अॅसिडला हटवून पीएचचा स्तर सामान्य करू शकतो.
-लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेले अॅसिड जर्म्सला दूर करुन दुखणे कमी करण्यास मदत करतात. तोंडात लिंबूचा तुकडा ठेवून तो चावल्यास किंवा चुळ भरल्यास दात किडीच्या समस्येपासून दूर होण्यास मदत होते.
हेही वाचा- लाल तिखटाचा अतिवापर ठरू शकतो घातक