घरताज्या घडामोडीLockdown: दाढी वाढवणाऱ्यांसाठी महत्वाचा Alert! मास्क खरेदी करताना 'ही' काळजी घ्याच

Lockdown: दाढी वाढवणाऱ्यांसाठी महत्वाचा Alert! मास्क खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्याच

Subscribe

कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी सरकारपासून डॉक्टरांपर्यंत सगळे जण लोकांना घराबाहेर पडताना मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मास्क अविभाज्य घटक झाला आहे. सध्या कोरोना विषाणू आणि मास्कवर अनेक संशोधन होऊन नवनवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच सीडीसीने (CDC) लोकांना या विषाणूपासून वाचण्यासाठी मास्क घालताना आणि खरेदी करताना काही सावधगिरी आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच खासकरून ज्या व्यक्तींची दाढी आहे, त्यांच्यासाठी सीडीसीने विशेष सल्ला दिला आहे.

मास्क निवड कशी कराल?

१. मास्क खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की, तो मास्कमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक स्तर (लेअर) नसतील. कारण यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही. तसेच ते वापरल्यानंतर धुतले जाऊ शकते.
२. आपले तोंड आणि नाक दोन्ही व्यवस्थित झाकले जाईल असे मास्क घ्या.
३. मास्क घातला तो तुमच्या चेहऱ्या सैल झाला नाही पाहिजे.
४. तसेच मास्कच्यावरुन हवा टाळण्यासाठी मास्कच्या नाकाच्या ठिकाणी तार लावली आहे की हे पाहा.
५. लहान मुलांसाठी मास्क खरेदी करताना मास्क व्यवस्थित तोंडावर बसला जाईल हे पाहा.

- Advertisement -

मास्क खरेदी करताना या चुका टाळा

१. विसरूनही असा मास्कचा वापर करू नका, जो घालून तुम्हाला श्वास घेताना त्रास होईल.
२. तसेच श्वास सोडण्यासाठी वाल्व्ह किंवा व्हेंटस असलेला मास्क वापरू नका. असे मास्क विषाणूपासून वाचण्यासाठी सक्षम नसतात.

- Advertisement -

दाढी असलेल्या व्यक्तींनी या गोष्टी ध्यानात घ्या

१. चेहऱ्यावर दाढी असलेल्या लोकांनी मास्क खरेदी करताना मास्क फिटर किंवा ब्रेस वापरा.
२. जास्त स्तर असलेला मास्कच्या खाली डिस्पोजेबर मास्क घाला. दुसरा मास्क चेहरा आणि दाढीवर घातलेल्या मास्कच्या शेवटी जोडलेला असावा.
३. असे लोकं जे आपल्या दाढीला ट्रिम करत नाहीत, त्याच्या तोंडावर मास्क सैल बसू शकतो. अशा दाढी असलेल्या लोकांनी देखील मास्क घातला पाहिजे.

मास्क घालण्याचा योग्य मार्ग

१ .मास्क घालण्यापूर्वी आपले हात धुवावेत किंवा हँड सॅनिटाझरचा वापर करावा.
२. तोंडावर मास्क घालताना मास्कला स्पर्श करू नका. जर तुम्हाला वारंवार मास्क हात लावावा लागत असेल तर समजा मास्क योग्य बसत नाही आहे. तुम्हाला तुमचा मास्क बदलण्याची आवश्यकता आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -