लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप खूप आव्हानात्मक असते. यामध्ये नात्यात अनेक चढ उतार येत असतात. या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये प्रत्येक गोष्ट एका आव्हानाप्रमाणे असते. आता लवकरचं व्हॅलेंटाइन डे येणार आहे. बऱ्याच जोडप्यांना असं वाटते आपण लांब असल्यामुळे हा दिवस साजरा करू शकत नाही. परंतु तुम्ही सुद्धा व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकता. आज आपण जाणून घेऊयात लॉन्ग डिस्टन्स व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करू शकतो.
व्हिडिओ कॉल डेट
तुम्ही एक व्हिडिओ कॉल डेट प्लॅन करू शकता. घरी सुंदर लाइटिंग आणि सजावट करून एकमेकांसोबत व्हिडिओ कॉलवर डिनर किंवा कॉफी डेट प्लॅन करू शकता किंवा एकाच वेळी आवडती मूव्ही देखील पाहू शकता.
सरप्राइझ गिफ्ट पाठवा
हँडमेड कार्ड, परफ्यूम, गोड सरप्राइझ बॉक्स किंवा त्यांना हवं असलेलं काही खास गोष्ट पाठवू शकता. तुम्ही एक मेमरी बुक देखील तयार करू शकता.
ऑनलाइन गेम्स किंवा क्विझ खेळा
तुम्ही ऑनलाइन गेम्स देखील खेळू शकता. फन आणि रोमँटिक गेम्स खेळा, ज्यामुळे तुमचं रिलेशनशिप अधिक मजबूत होईल. एकमेकांबद्दल क्विझ तयार करा आणि त्यावर चर्चा करा.
प्रेमपत्र
तुम्ही स्वतःच्या हाताने लिहिलेलं प्रेमपत्र किंवा ऑडिओ मेसेज पाठवा. या पत्रामध्ये तुमच्या भावना व्यक्त करा.
डिजिटल सरप्राइझ तयार करा
एक रोमँटिक व्हिडिओ बनवा, ज्यामध्ये तुमच्या खास आठवणी असतील. व्हर्च्युअल स्कॅव्हेंजर हंट” तयार करा. जिथे तुम्ही लहान-लहान हिंट देऊन सरप्राइझ शेवटी मिळेल.
एकत्र जेवण बनवा
तुम्ही व्हिडिओ कॉलवर एकत्र जेवण बनवू शकता किंवा ऑनलाइन डिलिव्हरीने एकमेकांसाठी जेवण मागवा आणि सोबत जेवा
हेही वाचा : Valentine Day Gift Ideas : व्हॅलेंटाइन डेनिमित्त पार्टनरला द्या हे खास गिफ्ट
Edited By : Prachi Manjrekar