Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल Chandrayaan-3 मध्ये 'या' महिलांची होती महत्त्वाची भुमिका

Chandrayaan-3 मध्ये ‘या’ महिलांची होती महत्त्वाची भुमिका

Subscribe

इस्रोचे चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्याने जगभरातून देशाचे कौतुक केले जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश बनला आहे. चांद्रयान-3 ची सर्वत्र चर्चा केली जातेय पण यामध्ये काही महिलांची भुमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे. याच महिलांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

डॉ. रितु कारिधाल कोण
चांद्रयान-3 च्या लँन्डिंगच्या जबाबदारीमागे डॉ. रितु कारिधाल यांची सुद्धा महत्त्वाची भुमिका होची. रितु कारिधाल वरिष्ठ महिला वैज्ञानिक आणि चांद्रयान-3 मिशनच्या डायरेक्टर आहेत. यापूर्वी त्यांनी मंगलायनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर आणि चांद्रयान-2 च्या सुद्धा डारेक्टर होत्या. डॉ. ऋतू कारिधा यांना ‘रॉकेट वुमन ऑफ इंडिया’च्या नावाने ओळखले जाते.

- Advertisement -

कल्पना कालाहस्ती
कल्पना कालाहस्ती चांद्रयान-3 मिशनच्या एसोसिएट डायरेक्टर आहेत. यापूर्वी त्या चांद्रयान-2 मिशनमध्ये सुद्धा होत्या. कल्पना कालाहस्ती चित्तूर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत आणि त्यांनी चेन्नई बीटेक ईसीईमधून शिक्षण घेतले आहे. कल्पना यांना बालपणापासूनच इस्रोत नोकरी करायची होती. कल्पनाचे वडिल मद्रास उच्च न्यायालयात काम करायचे.

मुथैया वनिता
मुथैया वनिता इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम इंजिनिअर आहेत. हार्डवेअर परीक्षण ते चांद्रयान-2 चंद्र मिशनच्या योजनेच्या निर्देशक बनण्यापर्यंत त्यांनी विविध मिशनसाठी काम केले आहे.

- Advertisement -

अनुराधा टी. के कोण आहे?
अनुराधा टी. के सेवानिवृत्त भारतीय वैज्ञानिक इस्रो आणि विशेष संचार उपग्रहांच्या मिशनच्या निर्देशक होत्या. अनुराधा 1982 मध्ये आंतरळा एजेंसीमध्ये सहभागी झाल्या आणि सर्व उपग्रह मिशनच्या निर्देशक असणाऱ्या पहिल्या महिला होत्या.


हेही वाचा- Chandrayaan-3: सुशांत सिंह ते टॉम क्रुज यांनी खरेदी केलीयं चंद्रावर जमीन 

- Advertisment -