भात खायला अनेकांना खूप आवडतो. अनेकजण जेवताना चपाती किंवा भाकरीपेक्षा भात खाणं जास्त पसंत करतात. भारतातील अनेक राज्यांमध्ये तांदूळ मुख्य आहार मानला जातो. भारतीय परिपूर्ण आहारामध्ये भाज्या पोळी/ भाकरी किंवा भातासोबत खाल्ल्या जाताता. पूर्वीच्या काळी लोकांच्या दररोजच्या आहारात पोळी/ भाकरी आणि भात या दोन्हीचा समावेश असायचा. मात्र, हल्ली अनेकजण वजन कमी करण्यासाठी किंवा डायटिंगमुळे पोळी/ भाकरी किंवा भाताचा यांपैकी एकाचच आहारात समावेश करतात. मात्र, हेल्दी राहण्यासाठी हा आहार योग्य आहे का?
हेल्दी राहण्यासाठी पोळी आणि भात यातील काय खाणं योग्य?
- Advertisement -
- पोळी आणि भात या दोन्हीमध्ये कार्बोहाइड्रेट आणि कॅलरीज एकसारखे असते.
- पोळी आणि भात या दोन्हीमध्ये आयर्न देखील एकसारखे असते.
- भाताच्या तुलनेत पोळी अधिक पोषक असते. मात्र, यात सोडियम देखील असते. प्रत्येक 120 ग्राम गव्हाच्या पिठामध्ये 190 मिलीग्राम सोडियम असते. भातामध्ये सोडियम नसते.
- पोळीमध्ये अधिक प्रोटीन आणि फायबर असते. भातामध्ये कमी फायबर असते.
- पोळीमध्ये पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते. पण तांदळामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फोरस नसते.
- तांदळामध्ये स्टार्च असते त्यामुळे ते लवकर पचते. मात्र, पोळी पचायला जड असते.
- Advertisement -
त्यामुळे पोळी आणि भात दोन्हींचा नियमीत आहारात समावेश करणं उत्तम असते. भाताच्या तुलनेत पोळी पोषक असते परंतु भात देखील शरिरासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.