Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल स्पेशल चिकन धनिया मसाला

स्पेशल चिकन धनिया मसाला

Related Story

- Advertisement -

चिकनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असते. शिवाय चिकन खाण्यासही टेस्टी असते. यामुळे मांसाहारी व्यक्तींची चिकनला विशेष पसंती असते. तसेच चिकनचे वेगवेगळे प्रकारही बनवता येतात. यामुळे सतत नवीन टेस्टच्या शोधात असणाऱ्यांना चिकनच्या व्हरायटी विशेष करून आवडतात. अशीच अजून एक भन्नाट चिकन रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यात मसाल्यांऐवजी कोथिंबीर व धन्याचा वापर करण्यात आला आहे.

साहीत्य- पाव किलो स्वच्छ धुतलेले चिकनचे पीस, २ बारीक चिरलेले कांदे, पाव वाटी दही, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, तीन चमचे अख्खे धने, अर्धी वाटी काजूची पेस्ट, तीन चमचे आलं लसूण पेस्ट, तीन हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ, तूप, एक चमचा कसूरी मेथी, एक चमचा जीरे पावडर, दोन चमचे लाल मिरची पावडर, दोन चमचे गरम मसाला.

- Advertisement -

कृती-एका पसरट भांड्यात दोन पळी तूप घ्या. त्यात कांदा लालसर भाजून घ्या. त्यात हिरवी मिरची व आलं लसूण पेस्ट टाका. नंतर त्यात चिकन व मीठ टाका. चांगल परतून घ्या. नंतर त्यात हळद, जीरे पावडर, धने पावडर, कसूरी मेथी व लाल मिरची पावडर टाका. त्यानंतर दही व काजूची पेस्ट टाका. गरम मसाला टाकून चिकन चांगल परतून घ्या. चिकन शिजेल एवढं पाणी टाका. भांड्यावर झाकण ठेवा. वरतून कोथिंबीर टाका. चिकन धनिया मसाला तयार. गरम चपाती, नान किंवा पराठ्याबरोबर ही डिश अप्रतिम लागते.

 

- Advertisement -