शरीरासाठी शाकाहारी की मांसाहारी जास्त फायदेशीर आहे यावरून आपण वाद झालेले पाहिलेच असतील. याचप्रमाणे आणखी एका विषयावरून वाद होतात ते म्हणजे चिकन की मटण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मासांहारीप्रेमींमध्ये चिकन आणि मटण दोन्ही पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण, शरीरासाठी जास्त ताकदवर काय आहे? समजून घेऊयात,
चिकन की मटण?
आहारतज्ञांच्या मते, चिकन आणि मटण दोन्हींचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे. पण, काही वेळा चिकन आणि मटण शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
चिकन –
- चिकन खाणे शरीरासाठी फायदेशीर असते, केवळ खाताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
- चिकनमध्ये व्हिटॅमिन बी 6, नियासिन, सेलेनियम आदींचा समावेश असतो. ज्यामुळे खोकला, सर्दी झाल्यावर चिकन खाणे फायद्याचे ठरते.
- बॉयलरपेक्षा गावठी कोंबडी खावी. गावठी कोंबडीमध्ये अधिक पोषकतत्वे आढळतात.
- चिकन बनवताना जास्त मसाले वापरू नयेत.
- चिकनमध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते.
- उकळवलेल्या चिकनचे सूप शरीरासाठी लाभदायक असते. यातून शरीराला जास्त प्रोटिन्स मिळतात.
- चिकन शिजवताना त्यातील सर्व चरबी काढून टाकायला हवी. याशिवाय चिकन व्यवस्थित धुवून त्यानंतर शिजवावे.
मटण –
- मटण शरीरातील कोलेस्टॉल वाढवते, ज्यामुळे आजारांचा धोका वाढतो.
- मटण शरीरासाठी फायदेशीर असले तरी, प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.
- चिकनच्या तुलनेत मटण पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला जर पोटाच्या निगडीत काही समस्या असतील तर मटण खाणे टाळायला हवे.
- मटण सूप आजारी व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. तज्ञही आजारी व्यक्तीला मटण सूप प्यायला देण्याचा सल्ला देतात.
- मटण थंडीच्या दिवसात आवर्जुन खायला हवे. मटण शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करते.
- मटण खाल्लाने शरीराला अधिक उर्जा मिळते.
चिकन की मटण फायदेशीर –
- आहारतज्ञांच्या मते, चिकन आणि मटण शरीरासाठी फायदेशीर असले तरी चिकन शरीरासाठी अधिक फायदेशीर असते.
- वेटलॉससाठी चिकन फायदेशीर असते, कारण यात कमी फॅट आणि कॅलरीज आढळतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चिकन सूप, ग्रील्ड चिकन खाऊ शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde