Saturday, March 15, 2025
HomeमानिनीHealthChickpeas Benefits :भिजवलेले की उकडलेले कडधान्य खाणे फायदेशीर?

Chickpeas Benefits :भिजवलेले की उकडलेले कडधान्य खाणे फायदेशीर?

Subscribe

जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे असेल तर दररोज कडधान्य खाणे आरोग्यासाठी चांगले असते. जिममध्ये कसरत करून शरीरयष्टी वाढवणाऱ्यांच्या आहारात कडधान्य खाणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. कडधान्य खाणे आरोग्यदायी मानले जाते. विशेषतः जेव्हा मोड आलेले कडधान्य खाल्ले जाते तेव्हा त्याचे अधिक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. याच कडधान्यांपैकी एक असलेले हरभरे हे एक सुपरफूड आहे. हे हरभरे आपण कोणत्या पद्धतीने खातो यावर त्यातून मिळणारे फायदे अवलंबून असतात. काही लोकांना भिजवलेले हरभरे खायला आवडतात तर काहींना ते उकडून खायला आवडतात, तर काही जण हरभरे भाजून खातात. परंतु वेगवेगळ्या पद्धतीने हरभरे किंवा चणे खाल्ल्यास त्याची पौष्टिकता कमी होते का? आणि कोणत्या पद्धतीने हरभरे खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते याविषयी जाणून घेऊयात.

रात्रभर भिजवलेले हरभरे :

Chickpeas Benefits: Is it beneficial to eat soaked or boiled chickpeas?

भिजवलेले हरभरे खाणे शरीरासाठी आरोग्यदायी समजले जाते. भिजवलेले चणे हे प्रोटिन्सने समृद्ध असतात. यामुळे ज्या लोकांची पचनशक्ती चांगली नाही त्यांनी भिजवलेले चणे अधिक प्रमाणात खाणे योग्य नाही. भिजवलेले चणे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांना दूर ठेवतात.

उकडलेले हरभरे :

Chickpeas Benefits: Is it beneficial to eat soaked or boiled chickpeas?

उकडलेले हरभरे कोणत्याही मसाल्यांशिवाय खाल्ले तर ते भिजवलेल्या चण्यांइतकेच फायदे देऊ शकतात. पण जर तुम्ही त्यात मसाले टाकून खात असाल तर तुम्हाला त्याचा तितका फायदा मिळणार नाही. उकडलेले चणेदेखील आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहेत.

पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेले हरभरे

हरभरे हे ऊर्जेने समृद्ध असलेले अन्न आहे. प्रथिनांचा साठा आणि भरपूर पोषक तत्वे यामध्ये आढळतात. हरभऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, खनिजे आणि फॅटी अ‍ॅसिड्स असतात. हरभरा व्हिटॅमिन बी चा देखील चांगला स्रोत आहे. दररोज हरभरा खाल्ल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हरभरा खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज मूठभर हरभरा खाणे आवश्यक आहे. त्यामुळे भिजवलेले अथवा मसालामी न टाकता उकडलेले हरभरे खाणे आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे.

हेही वाचा : Holi 2025 : होळी का साजरी करतात ? जाणून घ्या


Edited By – Tanvi Gundaye

Manini