घरलाईफस्टाईलएकाच मांडवात अल्पवयीन बहिणींचे लग्न

एकाच मांडवात अल्पवयीन बहिणींचे लग्न

Subscribe

आयुष्यात लग्नाचा निर्णय हा फार महत्वपूर्ण मानला जातो. कारण यावेळी जर चुक झाली तर संपूर्ण आयुष्यभर त्याचा त्रास होत राहतो. अशातच राजस्थान मधील जोधपुरात राहणारी गुडिया हिचे लग्न वयाच्या 14 व्या वर्षात करण्यात आले होते. आता ती 32 वर्षांची असून तिला तीन मुलं असून ती नवऱ्यासोबत राहत नाही.

गुडिया हिला 8 बहिणी आहेत. म्हणजेच लग्नासाठी आठ जणींचा डोक्यावर भार असे घरातले मानत होते. यामुळे जेव्हा घरातील मोठ्या मुलीला मुलगा मिळाला तेव्हाच त्यांनी गुडियासोबत अन्य चार बहिणींचे सुद्धा एकाच मांडवात लग्न लावून दिले. यामागील कारण असे होते की, त्यांना गावकऱ्यांना किंवा नातेवाईकांना चार वेळा जेवण द्यावे लागणार नाही. केवळ एकदाच जेवणाची पंगत आणि चार जणीचा भार कमी. त्या सर्वांचे लग्नावेळी वय 18, 17, 14 आणि 13 वर्ष होते.

- Advertisement -

जोधपुर मधील हिची एकटीचीच कथा अशी नाही. येथील शेकडो मुलींसोबत सुद्धा असेच झाले. त्यांचे जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. त्यानंतर त्यांच्यासोबत काय होते ही एक वेगळीच कथा आहे.

गुडियाने तिच्या आयुष्याबद्दल सांगताना असे म्हटले की, गरिब घरात जन्माला आल्यानंतर कोणती ना कोणती किंमत चुकती करावी लागते. आमच्या आई-वडिलांना आम्ही त्यांच्यावर भार असल्याचे वाटायचे. त्यामुळेच हा भार लवकर गेला पाहिजे असा ते विचार करायचे. बहिणींचे लग्न सुद्धा एकाच वेळी केले जायचे कारण जेवणासाठी खर्च कमी होईल. हे केवळ आमच्या घरी-सामाजात नव्हे तर आसपासच्या हिंदू असो अथा मुस्लिम यांच्यामध्ये सुद्धा होते.

- Advertisement -

नवऱ्याने सुद्धा फार लैंगिक छळ केल्याचे गुडियाने म्हटले. मुलांसमोर ही तो मला मारझोड करायचा. त्यामुळे मुलांना सुद्धा त्याच्यासोबत रहावे असे कधीच वाटले नाही. पोलिसांना आणि शेजारील लोकांना सुद्धा नवऱ्याच्या अशा प्रकाराबद्दल सांगितले पण काहीही उपयोग झाला नाही. याबद्दल माहेरी सांगितले तेव्हा सुद्धा त्यांनी हे सर्वकाही ठिक होईल असेच म्हटले.

महिला पोलिसांत ही तक्रार केली. त्यांनी ही नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो सुधारला नाही. आता माहेरच्या मंडळींना आणि मुलांना त्याच्यासोबत न राहिलेलेच बरे असे वाटतेय. गुडिया ही अशिक्षित असून ती शिवणकाम करत तीन ते चार हजार रुपयांची कमाई करते. परंतु या पैशांतून मुलांचे पालनपोषण करणे मुश्लिक होतेय असे गुडियाने म्हटले.


हेही वाचा- ‘या’ गावात महिला 5 दिवस असतात विवस्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -