Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthचाइल्डहुड ट्रॉमामधून असे बाहेर पडा

चाइल्डहुड ट्रॉमामधून असे बाहेर पडा

Subscribe

बालपणाबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा लोकांच्या डोक्यात बालपणी मित्रमैत्रीणींसोबत केलेली मस्ती, खोडकरपणा, एकत्रित खेळणे, भांडणे अशा सर्व गोष्टी आठवतात. बालपणीच्या खुप काही आठवणी असतात. परंतु अशा काही आठवणी असतात ज्यांचा आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडतो. त्या आठवणी आपल्याला वेळोवेळी ट्रिगर करतात. हा ट्रॉमा असा असोत जो तुम्हाला मानसिकरित्या त्रास देतो. यामधून बाहेर निघणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा एखाद्या चाइल्डहुड ट्रॉमामध्ये अडकले असाल तर पुढील काही टिप्सच्या मदतीने बाहेर पडू शकता.

-चाइल्डहुड ट्रॉमापासून दूर होण्यासाठी तुम्ही योगा आणि मेडिटेशन करा. यामुळे डोक शांत होते आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारले जाते.

- Advertisement -

-जेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट ट्रिगर करते तेव्हा पालकांसोबत जरुर बातचीत करा. त्यांच्यासोबत संवाद ठेवा. आपल्या समस्या शेअर करा.

-आपल्या भावना उघडपणे पालकांसमोर एक्सप्रेस करा. त्यांना तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींबद्दल सांगा. गरज भासल्यास साइकोलॉजिस्टची मदत घ्या. प्रत्येकवेळी दु:खी किंवा उदास राहण्याऐवजी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

किती प्रकारचे असतात ट्रॉमा
-फिजिकल ट्रॉमा
बहुतांश आई-वडील मुलांनी चुक केली तर त्यांना मारतात. जे मुलांमध्ये फिजिकल ट्रॉमाचे कारण ठरू शकते.

-सेक्शुअल ट्रॉमा
मुलांच्या प्रायव्हेट पार्टला टच करणे, त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण होते. हे सुद्धा सेक्शुअल ट्रॉमाचे कारण आहे.

-मानसिक ट्रॉमा
या सर्व घटना तुम्हाला मानसिक ट्रॉमा देतात. यामुळे तुम्ही काही वेळेस ट्रिगर होऊ शकता. तुम्हाला कळत सुद्धा नाही की, तुम्ही कोणत्या ट्रॉमामधून जात आहात.


हेही वाचा-  डोकेदुखीची ‘ही’ असू शकतात कारणे

- Advertisment -

Manini