मुले वर्षभर जरी अभ्यास करीत असली तरी परीक्षे आधी काही महिने मुलांची आणि पालकांची तारांबळ ही उडतेच. घराघरात तणावाचे वातावरण निर्माण होते. यासाठी मुलांनी दीर्घकाळ परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असते कारण परीक्षेच्या तणावामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. आज आम्ही तुम्हाला परीक्षेवेळी मुलांना पालकांनी कोणता हेल्दी डाएट देणे फायद्यचे ठरेल याबद्दल सांगणार आहोत.
परीक्षेदरम्यान, शरीर हायड्रेट राहणे अत्यंत आवश्यक असते. पाणी आपल्या शरीरातील केमिकल्स रिक्शनला गती देतात. ज्याने आपला मेंदू वेगाने काम करू लागतो. तसेच थकवाही कमी होतो. याशिवाय तुम्ही गोष्टी विसरत असला तर यावर नियमित पाणी फायद्याचे ठरेल. उत्तम मानसिक आरोग्यासाठी दररोज दीड लिटर पिणे गरजेचे असते. अशावेळी पाणी प्यायला विसरायला होत असेल तर अभ्यासाला बसताना मुलांच्या डेस्कवर पाण्याची बॉटल ठेवा.
मुलांना अभ्यास करताना हलके पदार्थ खायला द्या. तेलकट, जंक फूड देऊ नका. शेंगदाणे, ज्यूस, ड्रायफ्रूट्स, ओट्स तुम्ही मुलांना देऊ शकता. हे पदार्थ मुलांना एनर्जी मिळविण्यासाठी फायद्याचे ठरतील. शिवाय मुलांचे पोटही भरलेले राहील. हिरव्या भाज्यांचे सेवन मुलांना अवश्य करायला लावा.
जर मुलांना अभ्यास करताना थकवा आणि स्ट्रेस जाणवत असेल तर मुलांना ब्लॅक कॉफी तुम्ही देऊ शकता किंवा ग्रीन टी सुद्धा देऊ शकता. याच्या सेवनाने मुलांची एकाग्रता वाढते.
अभ्यासातून जेव्हा मुले ब्रेक घेतील तेव्हा मुलांना फळे खायला द्या. आपल्या मेंदूमध्ये ८५ टक्के पाणी असते. संत्री, काकडी, द्राक्षांचे सेवन केल्याने मेंदू हायड्रेट राहतो.
याशिवाय मुलांना दूध प्यायला द्या. खरतर दररोज रात्री मुलांना दूध द्यायला हवे. दुधात व्हिटॅमिन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम असतात. हे सर्व पोषक स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असतात.
हेही वाचा : सावधान! दूध किंवा ज्यूससोबत औषधं घेणं आरोग्यासाठी घातक