घरलाईफस्टाईलअसे बना मुलांचे आदर्श आई-बाबा

असे बना मुलांचे आदर्श आई-बाबा

Subscribe

आजकालच्या मुलांना संस्कारच नाहीत असे अनेक पालक ओरडत असतात. ‘श्यामच्या आई’मधील श्यामची तुलना तुम्ही आजच्या पिढीतील मुलांशी करत असाल तर तुम्हालाही श्यामची आई व्हावे लागेल. आधी तुम्ही तसे आहेत का ते पडताळून बघा मगच मुलांना दोष द्या.पालक म्हणून स्वत:चं निरीक्षण फक्त आईनेच नाही तर आई-बाबा दोघांनीही करायला हवे. श्यामच्या आई एवढं तुम्हाला शक्य नसलं तरी फक्त काही गोष्टी करुन तुम्ही तुमच्या मुलांचे आदर्श आई-बाबा बनू शकता.

*मुलांना सारखं ओरडू नका.

- Advertisement -

*मुलांसमोर ज्येष्ठांचा अपमान करु नका.

*मुलांच्या हातून चूक झाल्यास त्यांना शिक्षा देण्यापेक्षा किंवा मारण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजावून त्यांची चूक लक्षात आणून द्या. तसेच ुपुन्हा अशी चूक कशी टाळावी ते समजून सांगावे.

- Advertisement -

*चांगला अभ्यास किंवा एखादे चांगले काम केल्यास मुलांचे कौतुक करा.

*मुलांसमोर व्यसन करु नका. कारण मुले हे आपले अनुकरण करत असतात.

* मुलांना प्रत्येकवेळी गृहीत धरण्यापेक्षा त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्या.

*मुलांपुढे कधीही वाईट शब्द वापरु नका. कारण आपण वापरलेले शब्द ते लक्षात ठेवतात आणि पुढे चालून ते त्याच शब्दांचा वापर करायला लागतात.

*ऑफिसमधील टेंशन मुलांवर काढून त्यांच्यावर उगीच चिडू नका. असे वारंवार होत राहिल्यास मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो.

*मुलांना उगीचच भीती घालून देऊ नका. अनेकांना सवय असते की, मूल ऐकत नसेल तर त्याला एखाद्या गोष्टीची भीती दाखवली जाते. पण असे केल्याने तुमचे मूल धाडसी न बनता कायमचे भित्रे बनण्याची शक्यता जास्त असते.

*मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायला हवे असे नाही. आवश्यक असेल त्याच गोष्टींचा हट्ट पुरवावा. आवश्यक नसेल तर त्यांना समजून सांगा की, आपण ती वस्तू का घेत नाही आहोत ते. म्हणजे मुलांना सुद्धा कळेल की, आपल्याला हवी असलेली गोष्ट पालकांनी का घेऊन दिली नाही ते.

*मुलांना विविध छंद जोपासायला शिकवा. त्यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. शिवाय त्यांचा वेळही आनंदात जाईल.

* मुलांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचा सतत प्रयत्न करत रहावा. म्हणजे मुलांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आपसूकच निर्माण होईल.

*मुलांपुढे कधीही वाद-विवाद करु नये. कारण असे जर वारंवार होत राहिले तर सतत आई-बाबांच्या वादामुळे मुले स्वत:ला असुरक्षित समजू लागतात.

*नेहमी मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवा.

*मुलांना प्रत्येक गोष्टींचे ज्ञान स्वत:हून द्यायला शिका. उदाहरणार्थ- मुलांसोबत तुम्ही कुठे टूरला किंवा सहलीला गेलात तर तेथील इतिहास मुलांना सांगावा. त्यांचे ऐतिहासिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न ठेवावा.

*मुलांशी संवाद साधताना नेहमी सौम्य शब्दांत बोला.

*मुलांना मोठ्या आवाजात कधीच रागावू नका. आवाजाचा स्तर मोठा करुन कधीच बोलू नका. असे केल्यास मुले कायम तुमच्या दडपणाखाली जगणार. ती तुमच्याशी कधीच मोकळेपणाने संवाद साधणार नाहीत.

*आजकाल मुलांना मोबाईलमध्ये गेम खेळण्याची खूप सवय झालेली असते. पण त्यांना एका वेळची मर्यादा ठेऊनच मोबाईल खेळायला द्यावा.

*दररोजचे स्वत:चे काम स्वत: करायला शिकवा, थोडक्यात त्यांना स्वावलंबी बनायला शिकवा.

*दररोज अभ्यास आणि खेळ यांचा ताळमेळ बसेल असे वेळापत्रक बनवायला शिकवा आणि नुसतेच बनवून नाही तर ते अमलातही कसे आणावे तेही शिकवा.

त्यासाठी आधी तुम्ही दररोज त्यांच्यापुढे तुम्ही तुमची ठरलेली कामे वेळापत्रकानुसार कशी पूर्ण करता ते दाखवायला हवे. तर ते तुमचे अनुकरण करत स्वत:ही तसेच वागतील.रोजच्या जीवनात अशा काही गोष्टींचे योग्य पालन, व्यवस्थापन केले तर तुम्ही तुमच्या मुलांचे आदर्श आई-वडील नक्कीच बनू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -