बाजारात मिळणारा स्पॉन्जी आणि मऊ केक घरी बनवता येत नसल्याची तक्रार बहुतेक जण करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी मऊ चॉकलेट केक कसा बनवायचा हे सांगणार आहोत.
साहित्य :
- दीड कप मैदा
- अर्धा पाव कोको पावडर
- 1 कप पिठी साखर
- 2 अंडी
- 1 कप ताजे दही
- 1/2 कप वितळलेले लोणी
- 1 चमचा व्हॅनिला इसेंस
कृती :
- सर्वप्रथम मैदा गाळून त्यात कोको पावडर आणि खाण्याचा सोडा मिसळा.
- एका भांड्यात लोणी आणि अंड्यामध्ये साखर घालून फेटा. मग त्यात दही मिसळा.
- आता यात थोडा-थोडा मैदा मिसळत राहा.
- थोडेसे पाणी आणि इसेंस टाकून लाकडी चमचाने हलवा.
- केक बनवण्याचा पॉट घेऊन त्याला तूप लावून त्यात थोडा मैदा लावा.
- आता या पॉटमध्ये तयार झालेले केकचे मिश्रण भरून ओव्हनमध्ये 350 डिग्री फे. वर बेक करा.
- केक बेक होऊन तयार झाल्यावर त्यावर चॉकलेट आईसिंग करून डेकोरेट करा.