आयलायनर हा मेकअपचा सर्वात मुख्य भाग आहे. आयलायनर लावल्याने आपले डोळे खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. बऱ्याचदा काहींचे डोळे हे मोठे असतात तर काहींचे खूप लहान जर कोणतेही आयलायनर लावले तर तुमचा लूक बिघडू शकतो. त्यामुळे योग्य आयलायनरची निवड करणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार या आयलायनरची निवड करू शकता. आज आपण जाणून घेऊयात डोळ्यांच्या आकारानुसार आयलायनरची निवड कशी करावी.
डोळ्यांचा आकार समजून घेणे
सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या डोळ्यांचा आकारसमजून घेणे आणि त्यानुसार तुम्ही या आयलायनरची निवड करू शकता. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांचा आकार माहित असेल तर तुम्ही सहजपणे आयलायनरची निवड करू शकता.
बदामाचे डोळे: क्लासिक कॅनव्हास
बदामाचे डोळे हा डोळ्यांचा एक प्रकार आहे. बदामाचे डोळे हे अंडाकृती आकाराचे असतात बदामाच्या आकाराचे असल्यामुळे हे डोळे उंचापेक्षा रुंद असतात. ते नैसर्गिकरित्या लांबलचक असतात आणि बाहेरील कोपऱ्यात थोडे वर वळलेले असतात, ज्यामुळे एक आकर्षक बदामासारखा आकार तयार होतो, अशा डोळ्यांच्या आकारासाठी क्लासिक कॅनव्हास आयलायनरची निवड करू शकता.
हुड असलेले डोळे: कलर आयलायनर
कपाळाच्या हाडापासून जास्त त्वचा दुमडून पापणी झाकली जाते तेव्हा त्यांना हुड केलेले डोळे म्हणतात. अशा डोळ्यांसाठी कलरबार ऑल-मॅट आयलाइनर अशा आयलायनर निवड करू शकता. हे आयलायनर खूप सुंदर आणि आकर्षक दिसते .
गोल डोळे : कलरबार आयलायनर
गोल डोळे हे गोलाकार असतात, ज्यामुळे ते लांबपेक्षा जास्त रुंद दिसतात. या डोळ्यांच्या आकारासाठी कलरबार इन्फिनाइट 24 आर्स आयलायनर परिपूर्ण आहे.
लहान डोळे : विंग आयलायनर
जर तुमचे डोळे खूप लहान असतील तर तुम्ही जाड विंग आयलायनर लावू शकता. यामुळे तुमचे डोळे चांगले हायलाइट होतील.
मोठे डोळे : कॅट आयलायनर
जर तुमचे डोळे मोठे असतील तर तुम्ही कॅट आयलायनर लावू शकता. याने तुमचे डोळे खूप सुंदर आणि आकर्षक दिसलतील.
हेही वाचा : Womens Day 2025 Gift Idea : आईला द्या हे खास गिफ्ट
Edited By : Prachi Manjrekar