आपण बाहेर फिरायला जाताना सर्वात आधी आऊटफिटचा विचार करतो, आऊटफिटप्रमाणे इतर गोष्टींची निवड करतो. आपला लूक सुंदर आणि परिपूर्ण दिसण्यासाठी आऊटफिटप्रमाणे ज्वेलरी मेकअपसह फूटवेअर देखील महत्वाचा भाग आहे. बऱ्याचदा आऊटफिट, मेकअप, ज्वेलरी या सर्व गोष्टी परफेक्ट असतात परंतु फूटवेअर आपण कोणतेपण घालतो, यामुळे संपूर्ण लूक खराब दिसतो. अनेकवेळा कळत नाही फूटवेअरची निवड कशी करू शकतो. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात परफेक्ट फूटवेअरची निवड कशी करावी.
मॅचिंग कलर
तुम्ही तुमच्या आऊटफिटला मॅच होईल अशा फूटवेअरची देखील निवड करू शकता. तुम्हाला मॅचिंग फूटवेअर सहजपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळेल. जर तुम्ही लाल रंगाचा ड्रेस घातला असेल तर त्यावर मोनोक्रोम लूकसाठी हील्स किंवा फ्लॅट्स घालू शकता. मॅचिंग कलरचे फूटवेअर तुमचा लूक अधिक खास बनवतील.
कलर कॉन्ट्रास्ट
तुम्ही कलर कॉन्ट्रास्ट देखील करू शकता. जर तुम्हाला स्टेटमेंट लूक किंवा पॉप किंवा बोल्ड लूक पाहिजे असेल तर कॉन्ट्रास्टिंग रंगाचे फूटवेअर चांगले दिसतील. जर तुम्ही निळा पोशाख घातला असेल तर पिवळ्या रंगाचे फूटवेअर खूप चांगले दिसतील. गुलाबी आऊटफिटसह लाल रंगाचे फूटवेअर घालू शकता.
प्रिंटेड ऑउटफिटसह सॉलिड फूटवेअर
जर तुम्हाला प्रिंटेड किंवा पॅटर्न असलेले कपडे घालायला आवडत असतील तर सॉलिड कलरचे फूटवेअर घालणे उत्तम पर्याय ठरू शकते. तुमच्या ऑउटफिटमध्ये अनेक रंग असल्याने, तुम्ही कोणताही एक रंग निवडू शकता आणि त्या रंगाचे फूटवेअर घालू शकता.जर तुम्ही लेपर्ड प्रिंट आउटफिट घातले असेल तर काळ्या किंवा तपकिरी रंगाचे फूटवेअर चांगले दिसतील.
अॅक्सेसरीज
प्रत्येक वेळी तुमच्या ऑउटफिटला मॅच होईल असे फूटवेअर घालणे गरजेचे नाही आहे. तुम्ही तुमच्या अॅक्सेसरीजसह फूटवेअर देखील निवडू शकता. तुमच्या बॅग, बेल्ट किंवा दागिन्यांशी मॅच होईल असा लूक देखील करू शकता. जर तुम्ही हिरव्या रंगाची हँडबॅग घेऊन जात असाल तर तुम्ही त्यासह हिरव्या रंगाचे फूटवेअर देखील घालू शकता.
हेही वाचा : Gota Patti Suits : ट्रेडिशनल लूकसाठी परफेक्ट गोटा पट्टी सूट्स
Edited By : Prachi Manjrekar