घरलाईफस्टाईलरोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात निवड करा 'आठ' खाद्यपदार्थांची

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात निवड करा ‘आठ’ खाद्यपदार्थांची

Subscribe

घरी सहज आढळणार्‍य काही पदार्थांचा उपयोग हा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो

कोरोना व्हायरस चा वाढता प्रसार पाहता. अनेक निर्बंध शासनाने लागू केले आहेत. वेळोवेळी हात धुणे,सानिटायझर वापरणे, मास्क घालणे या नियमांचे पालन आपण वेळोवेळी करतो. तरीही या व्यतिरिक्त खबरदारी बाळगता अनेक उपाय घरोघरी करण्यात येत आहेत. तसेच रोजच्या आहारात घरी सहज आढळणार्‍य काही पदार्थांचा उपयोग हा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो.पाहुयात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश यात होतो.

विटामिन सी युक्त पदार्थ- विटामिन सी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी घटक आहे. अनेक फळांमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. आवळा, संत्री, लिंबू, पेरु, चेरीज, यांमध्ये विटामिन सी ची मात्रा अधिक प्रमाणात असते, तसेच याव्यतिरिक्त तुळस,कडूलिंब,ग्रीन टी इत्यादि वस्तूंमध्येही विटामिन सी समाविष्ट आहे.

- Advertisement -

अॅंटीऑक्सीडेंट पदार्थ – गाजर,लसूण,आल,भोपळा,चेरीज यांमध्ये विटामिन सी, बी आणि ई चे प्रमाण जास्त असते. यामध्ये अॅंटीऑक्सीडेंट असल्यामुळे याचे सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतीकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

- Advertisement -

चक्रफुल- गरम मसाल्यांमध्ये सहज वापर होणार्‍या वस्तूंपैकीचक्रफुल हे घरोघरी आढळते. पण याचा अत्यंत गुणकारी उपयोग हा शरीरसाठी होतो. चक्रफुलामध्ये अनेक गुणकारी तत्व आहेत. यामध्ये शिमिक अॅसिड नावाचं एक घटक आहे. या घटकाचा उपयोग अॅंटीव्हायरल ड्रग्सला संश्लेशीत करण्यासाठी होतो. यातील गुणकारी तत्वामुळे अनेक आजार बरे होतात. तसेच चक्रफुलला पाण्यात उकळून पिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते.

ज्येष्टमध – आजीच्या बटव्यात हमखास सापडणारा ज्येष्ठमध मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मयुक्त आहे. यामध्ये अॅंटीव्हायरल,अॅंटी-माइक्रोबियल,अॅंटी-इफ्लेमटरी मुबलक पप्रमाणात आढळते ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यात मदत होते.

नारळाचे तेल – नारळामध्ये आढळणारे गुणधर्म हे विषाणू तसेच व्हायरल इन्फेक्शनशी लढाई करून रोगप्रतीकारशक्ती वाढवते. या व्यतिरीक्त नारळाचे तेल शरीरावर आलेली सुज कमी करण्यासाठी मदत करते.

फरमेटेंड पदार्थ – फरमेटेंड पदार्थांचा रोजच्या आहरात समावेश केल्यास रोगप्रतकर शक्ती वाढते. तसेच हे पदार्थ शरीरातील वाईट विषाणूशी लढून आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. फरमेटेंड पदार्थांमध्ये दही,खवा घरी बनवण्यात आलेली लोणची,यांचा समावेश होतो.

हळद – हळदी मध्ये करक्युमिन नामक घटकाचा समावेश असतो जो शरीरसाठी अत्यंत उपयोगी आहे. तसेच हळदी मध्ये अॅंटी- इंफ्लेमटरी गुण असतात. हळदीयुक्त दूध पिल्यास शरीराची पाचन क्रिया मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.


हे हि वाचा – उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -