काय गुबगुबीत गाल आहेत गं? असं ऐकल्यावर किती छान वाटतं. काहींचे जन्मत: गुबगुबीत गाल असतात तर काही असे गाल करण्यासाठी ट्रिटमेंट, व्यायाम करतात. गुबगुबीत आणि निरोगी गाल सर्वांनाच आकर्षक वाटतात. तुम्हालाही नैसर्गिकरित्या गुबगुबीत गाल हवे आहेत? मग ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे गाल गुबगुबीत आणि सुंदर होऊ शकतात. कोणतीही महागडी उत्पादने न घेता आहारात बदल केल्यास तुमचेही गाल गुबगुबीत होऊ शकतात. जाणून घेऊयात, गुबगुबीत गालांसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरेल,
धान्य –
ओट्स, गहू यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांनी रक्ताभिसरण वाढते आणि गालांमध्ये ओलावा टिकून राहतो.
अंडी –
अंड्यामध्ये रेटिनॉल, व्हिटॅमिन डी भरपूप प्रमाणात आढळते. या पोषकतत्वांमुळे त्वचा निरोगी राहते. अंड्यातील हे घटक पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि गाल गुबगुगबीत होण्यास मदत होते.
दुधाचे पदार्थ –
दुधाच्या पदार्थांमध्ये फॅट्स आणि कॅलरीज आढळतात. यामुळे वजन वाढण्यास आणि गाल भरण्यास मदत होते.
स्मूदी –
गुबगुबीत गालांसाठी स्मूदी तुम्ही प्यायला हवी. स्मूदीच्या सेवनाने प्रोटिन्स आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. यामुळे वजन वाढण्यास आणि गाल गुबगुबीत होण्यास मदत मिळते.
सफरचंद –
सफरचंद खाल्ल्याने गाल गुबगुबीत होतात. याशिवाय सफरचंद त्वचेसाठी फायदेशीर असते.
डाळिंब –
डाळिंबात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचा घट्ट होते आणि मऊ देखील होते. या फळातील फायबर, व्हिटॅमिन के, सी, बी, आयर्न, पोटॅशियम यासारखे घटक गाल गुबगुबीत होतात.
बीट-
बीट गुलाबी गालांसह गुबगुबीत गाल होण्यासाठी फायदेशीर असते.
हेल्दी त्वचेसाठी तज्ञ काय सांगतात –
हायड्रेटेड राहावे –
निरोगी राहण्यासाठी आणि त्वचा हेल्दी राहण्यासाठी तुम्ही हायड्रेट राहणे गरजेचे आहे. हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
व्यायाम –
नियमित व्यायाम केल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचा निरोगी राहते.
पुरेशी झोप –
त्वचेसाठी आणि हेल्दी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यायला हवी.
हेही पाहा –