Sunday, January 5, 2025
HomeमानिनीCinnamon : दालचिनीचे सेवन महिलांसाठी वरदान

Cinnamon : दालचिनीचे सेवन महिलांसाठी वरदान

Subscribe

स्वयंपाकघरात अनेक मसाल्यांचा वापर करण्यात येतो. भारतीय मसाले केवळ चवीसाठीच नाही तर औषधी गुणधर्मासाठी ओळखले जातात. यातील एक मसाला म्हणजे दालचिनी. स्वाद वाढवण्यासाठी स्वयंपाकघरात दालचिनीचा वापर करण्यात येतो. सुगंधासाठी वापरली जाणारी दालचिनी आरोग्यासाठी फायदेशीर असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दालचिनी महिलांसाठी वरदान मानली जाते. महिलांना जाणवणाऱ्या विविध समस्यांवर दालचिनीचे सेवन अतिशय प्रभावी मानले जाते. त्यामुळे जाणून घेऊयात, दालचिनीचे सेवन महिलांसाठी कसे फायदेशीर ठरते,

PCOS वर प्रभावी –

PCOS ची समस्या महिलांमध्ये सामान्य झाली आहे. ही समस्या हार्मोनल असंतुलनामुळे सुरू होते. त्यामुळे PCOSची समस्येने त्रस्त असाल तर दालचिनीचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

- Advertisement -

शरीर मजबूत बनवतो –

दालचिनीमध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, लाइकोपीन सारखे पोषक तत्वे आढळतात. ज्यामुळे शरीर आतून मजबूत करतात.

मासिक पाळीवर प्रभावी –

मासिक पाळीवर दालचिनीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. मासिक पाळीच्या काळात हार्मोन्स बदलतात आणि शरीरातील खराब रक्त बाहेर पडते. अशावेळी महिलांना पोटात दुखणे, कंबरदुखी, चिडचिड, मळमळ, अस्वस्थता जाणवते. अशावेळी साधारण: गरम पाण्याची पिशवी आणि चॉकलेट्स खाल्ले जातात. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही आहारात दालचिनीचा समावेश करायला हवा. दालचिनीमध्ये दाहक- विरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे गर्भाशयातील स्नायूंना आराम मिळतो.

- Advertisement -

दालचिनीचा चहा –

शरीराला उबदार ठेवण्यासाठी दालचिनीचा चहा पिणे फायदेशीर ठरेल.

मासिक पाळी नियमित होते –

जर तुम्हाला मासिक पाळीत अधिक रक्तप्रवाहाचा किंवा कमी रक्तप्रवाहाचा त्रास होत असेल तर दालचिनीचे सेवन तुमच्यासाठी अधिक प्रभावी ठरेल. दालचिनीतील गुणधर्म मासिक पाळीतील रक्तस्त्राव नियमित करण्यास ठरतात.

पचन होते सुरळीत –

पचनाच्या विविध समस्यांवर दालचिनीचे सेवन फायदेशीर ठरेल. एका संशोधनानुसार, दालचिनी गॅस्ट्रिक ज्यूसला उत्तेजित करते आणि पोटात गॅस तयार होत नाही. परिणामी , पोटही बिघडते आणि पचन व्यवस्था सुरळीत होते.

थकवा दूर होतो –

दालचिनी रक्तप्रवाह सुधारते आणि साखरेची पातळी स्थिर ठेवते, थकवा दूर ठेवते. थंडीच्या दिवसात झटपट उर्जा मिळण्यासाठी तुम्ही दालचिनीचा चहा प्यायला हवा.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini