लवकरच दिवाळी येणार आहे. दिवाळी येताच सर्वांच्या घरी स्वच्छता अभियान सुरु होते. दिवाळीच्या काही दिवस आधी साफसफाई केली तर कामे अजून सोपी होतात. दिवाळीत बरीच अशी कामे असतात, त्यामध्ये स्वयंपाकघराची स्वच्छता विशेष महत्वाची असते. या सणाच्या दरम्यान आपण बरेच पदार्थ बनवतो. त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ असणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच सणासुदीच्या काळात महत्त्वाच्या गोष्टी न मिळाल्यास आपली चिडचिड सुरू होते. स्वयंपाकघर योग्यरित्या स्वच्छ आणि व्यवस्थित करून ही समस्या आपण दूर करू शकतो. आज आपण जाणून घेऊयात दिवाळीपूर्वी स्वयंपाकघरातील कोणते कोपरे स्वच्छ करू शकतो.
कॅबिनेट स्वच्छ करा
किचन कॅबिनेटमध्ये कालांतराने धूळ, आणि अन्नकण यामध्ये अडकू शकतात. हे रगडून साफ केल्याने ते केवळ नवीनच दिसत नाहीत तर अनेक गोष्टी चकाचक देखील होतात.
- भांडी, चमचे सर्व वस्तू शेल्फ्मध्ये बाहेर काढा.
- हे कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी यामध्ये व्हिनेगर-पाणी मिश्रण घालून स्वच्छ करा.
- नंतर, स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की कोणतेही भांडे किंवा वस्तू तुमच्या उपयोगाचं नाही तर ते काढून टाका.
कटलरी आणि भांडी ड्रॉवर
कटलरी आणि भांडी ड्रॉव सहजपणे खराब होऊ शकतात. हे ड्रॉवरच्या काउंटरटॉपच्या खाली सेट केले जातात. स्वयंपाकघरात आपण वारंवार ड्रॉवर उघडतो. त्यामुळे यामध्ये धूळ किंवा अन्नकण सहजपणे प्रवेश करतात. जर हे कटलरी आणि भांडी ड्रॉवर साफ केले नाही तर हे अजूनच अस्वच्छ आणि यामधून दुर्गंध येते. त्यामुळे सणाच्या किंवा इतरवेळी देखील कटलरी आणि भांडी ड्रॉवर स्वच्छ करणे अंत्यत गरजेचं आहे.
- कटलरी आणि भांडी ड्रॉवर साफ करण्यापूर्वी सर्व कटलरी, भांडी आणि इतर कोणत्याही वस्तू ड्रॉवरमधून काढून टाका.
- भांडी आणि कटलरी स्वच्छ करण्यासाठी गरम, साबणयुक्त पाणी वापरा.
- ओलसर कापड आणि योग्य क्लिनर वापरून ड्रॉवरची आतील बाजू स्वच्छ करा.
- नीटनेटके आणि स्वच्छ दिसण्यासाठी ड्रॉवर डिव्हायडरचा वापर करा
ओटा
ओटा हा स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा भाग आहे. बऱ्याचदा हा ओटा स्वयंपाक करताना लगेच खराब होतो. यावर सहजपणे न जाणारे डाग बसतात. या ओटयावर पीठ मळण्यापासून ते भाज्या कापण्यापर्यंत सर्व काही करतो, म्हणून ते स्वच्छ करणे महत्वाचे आहे.
- तुम्ही ओटा साफ करण्यासाठी व्हिनेगर-वॉटरचा वापर करू शकता.
- तसेच बेकिंग सोडा आणि पाणी पेस्टसह टूथब्रश वापर करू शकता.
स्वयंपाकघरातील पॅन्ट्री
जर तुमच्या वस्तू पॅन्ट्रीमध्ये व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर स्वयंपाक करताना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पँन्ट्री स्वच्छ करणे अत्यंत गरजेचं आहे.
- प्रथम स्वयंपाकघरातील पॅन्ट्री रिकामी करा.
- पेंट्रीचे कोपरे ओलसर कापडाने किंवा व्हिनेगर आणि पाण्याने स्वच्छ करा.
- आणि नंतर स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून टाका.
- पॅन्ट्री काही काळ उघडी ठेवून त्यामध्ये डबाबंद वस्तू, मसाले, धान्य व इतर गोष्टी वेगवेगळ्या गटात ठेवा.
- तुम्ही कंटेनर वापरत असल्यास, पदार्थांना नाव द्या. जेणेकरून तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा ते तुम्हाला सहज सापडतील.
हेही वाचा : Kitchen Tips : हिरवी मिरची फ्रेश राहण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स
Edited By : Prachi Manjrekar