जेव्हा जेव्हा घर साफ करण्याचा विचार येतो तेव्हा घरात ठेवलेल्या मोठ्या गोष्टी पटकन साफ होतात. पण आपण अनेकदा लहान गोष्टी साफ करणे विसरतोच. यामुळे त्या लहान-सहान गोष्टी लगेच घाण होतात. सोफ्यावर ठेवलेल्या उशीला आपण खास प्रसंगी नवीन कव्हर लावतो पण ते साफ करत नाही. अशा परिस्थितीत ते आतून काळे आणि घाण होतात. पण आता काही सोप्या पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही उश्या सहज स्वच्छ करू शकता. जाणून घेऊया अशा पद्धती ज्याच्या मदतीने तुम्ही बेड वरच्या उश्या स्वच्छ करू शकता.
अनेकदा लोक वेगवेगळ्या प्रकारचे कुशन विकत घेतात आणि ते सजवतात. पण सजवल्यानंतर त्यांची साफसफाई करणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला व्हॅक्यूम क्लिनरची गरज आहे. त्याच्या मदतीने, तुमचा सोफा कुशन किंवा बेड्स कुशन काही मिनिटांतच साफ करू शकता.
- Advertisement -
- यासाठी तुम्हाला प्रथम सोफाचे सर्व पिलो कव्हर्स काढावे लागतील.
- मग हे कव्हर्स बाजूला ठेवावे लागतील.
- आता एका छोट्या व्हॅक्यूम क्लिनरने पूर्णपणे उशी स्वच्छ करून घ्या.
- हे स्वच्छ करताना त्यावरील सर्व घाण सहज निघून जाईल.
- यासारख्या अधिक उशांवर अशीच पद्धत ट्राय करा.
- मग एक नवीन स्वच्छ कव्हर घाला आणि बेड किंवा सोफा छानपैकी सजवा.
बेडच्या उशा ब्रशने स्वच्छ करा…
- उशीमध्ये धूळ जमा झाल्याचे दिसले तर फॅब्रिकच्या ब्रशने उश्या स्वच्छ करू शकता.
- यासाठी बाजारात उपलब्ध असलेले क्लीनजिंग ब्रश विकत घ्या.
- नंतर हलक्या हातांनी उशी स्वच्छ करा.
- यामुळे धूळ आणि साचलेला कचरा पूर्णपणे स्वच्छ होईल.
- यासोबतच, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काही वेळ सूर्यप्रकाशात उश्या ठेऊन द्या.
- ह्यामुळे उश्या ओलसर राहणार नाहीत.
उशी साफ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…
- जेव्हा तुम्ही सोफाचे कुशन स्वच्छ कराल तेव्हा खूप ओले कापड वापरू नका. यामुळे त्यातील फॅब्रिक खराब होईल.
- कठोर ब्रश वापरू नका हे लक्षात ठेवा. यामुळे कुशन खराब होऊ शकते.
- बाहेर उपलब्ध असलेल्या केमिकल सोल्युशन्सचा वापर करण्याऐवजी, घरी तयार केलेले साबणाचे पाणी वापरा.
- या पद्धती उश्या साफ करून वापरून पहा यामुळे तुमच्या सोफा आणि बेडवरच्या उशा स्वच्छ दिसतील.