Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल पाणी गरम करण्याची किटली 'असे' करा स्वच्छ

पाणी गरम करण्याची किटली ‘असे’ करा स्वच्छ

Subscribe

केटल हे भांडे बहुतेक सर्व घरांमध्ये वापरले जाते. तसेच पाणी गरम करून अनेक जन मॅगी, पास्ता आणि चहा बनवतात. पाणी गरम करणाऱ्या केटलमध्ये दररोज पाणी गरम केल्याने या भांड्याच्या तळाशी पांढर्‍या रंगाची घाण साचू लागते. ही घाण सहजासहजी साफ होत नाही. अशातच आता आपण पांढरी घाण साफ करण्याच्या काही टिप्स बघणार आहोत, ज्यामुळे ही घाण व्यवस्थित साफ होईल.

किटली स्वच्छ करण्यासाठी या टिप्स करा फॉलो-

 • व्हिनेगरच्या मदतीने केटलमध्ये साचलेली घाण साफ केली जाईल. किटली एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि पुसून टाका.
 • किटलीमध्ये अर्ध्याहून अधिक पाणी भरून त्यात 2-3 चमचे कॉस्टिक सोडा टाका आणि अर्धा तास पाणी किटलीमध्येच उकळू द्या.
 • पाणी आणि कॉस्टिक सोडा उकळल्यानंतर, ते थंड होण्यासाठी अर्धा तास तसेच सोडा. नंतर किटली स्क्रबरच्या साहाय्याने चोळून पूर्णपणे स्वच्छ करा.
 • किटली अर्ध्याहून अधिक पाण्याने भरा आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस किंवा सायट्रिक ऍसिड घाला.
 • 15 मिनिटे पाणी उकळण्यासाठी सोडा. नंतर, स्क्रबर आणि डिशवॉशने स्क्रब करून साचलेली घाण पुसून टाका.
 • केटलचे भांडे अर्धे पाण्याने भरा आणि त्यात 2-3 चमचे बेकिंग सोडा घाला.

How to clean a gas kettle: The 'stain-fighting' solution that banishes stubborn burn marks | Express.co.uk

 • किटली 20 मिनिटे उकळवा, थंड झाल्यावर डिश वॉश आणि स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा.
 • जर तुमच्या केटलमध्ये खूप पांढरी घाण असेल तर तुम्ही ज्या मिश्रणात किटली साफ करत आहात ते मिश्रण उकळून रात्रभर तसेच भांड्यात ठेवा.
 • असे केल्याने केटलमध्ये असलेली घाण रात्रभर पूर्णपणे स्वच्छ होईल.
 • महत्वाचे म्हणजे इलेट्रीक किटलीच्या वायरवर आणि त्या भांड्याच्या मशीनच्या भागावर पाणी पडू देऊ नका.
 • कारण यावर पाणी पडल्यास शॉक लागण्याची भीती असू शकते.

हेही वाचा : कुकरच्या शिटीतून पाणी येते, मग वापरा ‘या’ ट्रिक्

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -