टूरवरून आल्यानंतर आपण खूप थकतो. त्यामुळे बऱ्याचवेळा आपण बॅग कुठेही टाकून मोकळे होतो. बॅग दिवसभर तशीच पडून राहते. बऱ्याचदा आपल्याला लक्षात देखील येत नाही. साफसफाईकडे ही दुर्लक्ष होते. प्रवासातून परतल्यानंतर बॅग व्यवस्थित साफ करणे अत्यंत गरजेचे असते. बॅग लवकर स्वच्छ केली नाही तर बॅगमधील सामान आणि बॅग दोन्ही खराब होऊ शकते. आज आपण बॅग स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.
टूरवरून आल्यावर या महत्वाच्या गोष्टी चेक करून घ्या
- बऱ्याचदा आपण लांबचा प्रवास करताना डॉक्युमेंट्स किंवा काही कागदपत्रे घेऊन जातो ते आहेत का ते आधी तपासून घ्या.
- पैसे आणि कार्ड्स
- इलेक्ट्रॉनिक वस्तू
- कपडे आणि अॅक्सेसरीज
टूरवरून आल्यावर बॅग अशी करा स्वच्छ
बॅग रिकामी करा
प्रवासावरून आल्यावर सर्वात आधी बॅग रिकामी करून घ्या. बॅगचे प्रत्येक खिसे तपासून घ्या. उलटून चांगले झटकून घ्या.
धूळ आणि घाण काढा
जेव्हा आपण लांब प्रवास करायला जातो. तेव्हा बॅगमध्ये खूप कचरा जमा होतो. अशावेळी ती घाण काढण्यासाठी तुम्ही ब्रश किंवा मऊ कपडा वापरून धूळ आणि घाण काढू शकता.
डाग काढा
हलके डाग काढण्यासाठी कोमट पाण्यात माइल्ड डिटर्जंट मिसळा, मऊ कापड भिजवून ज्या भागात डाग आहेत तिथे कापड भिजवून डागांच्या भागावर रगडून काढा.
आतली स्वच्छता
बॅगेची आतील स्वछता देखील खूप महत्वाची असते. त्यामुळे बॅगेची आतली बाजू नीट पुसून घ्या. ओल्या कपड्याने पुसून घेतल्याने बॅग स्वच्छ होईल.
दुर्गंध
बॅगेतून दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही बॅगमध्ये बेकिंग सोडा किंवा कापराच्या गोळ्या काहीवेळ ठेवू शकता. यामुळे बॅगेतील दुर्गंध निघून जाईल. दुर्गंध निघून गेल्यावर बॅग काहीवेळ उन्हात ठेवा.
पाणी टाकू नका
बॅग पाण्यात भिजवू नका. त्याऐवजी ओलसर कापडाने साफ करून घ्या.
हेही वाचा : Kitchen Tips : एक्सपायर फेसवॉश घरातील या कामांसाठी फायदेशीर
Edited By : Prachi Manjrekar