हाइजिन मेंनटेन करणे उत्तम सवय आहे. त्यामुळे नेहमीच असा सल्ला दिला जातो की, स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पण अशी काही लोक असतात ज्यांना स्वच्छता करण्याची सवय असते. पण हिच सवय त्यांना एखाद्या व्यसनासारखी जडलेली असते आणि याबद्दल त्यांना माहितीच नसते.
क्लिनिंग एडिक्शनला ‘ऑब्सेसिव कंपल्सिव क्लिनिंग’ किंवा ‘कंपल्सिव क्लिनिंग डिसऑर्डर’ असेही म्हटले जाते. ज्या लोकांना हे एडिक्शन असते त्यांच्यामध्ये स्वच्छता करण्याची अधिक इच्छा किंवा सतत स्वच्छता करण्याचे मन करते. याचा परिणाम दैनंदिन आयुष्यावरही होत राहतो. याची लक्षणे काय आहेत हे पाहणार आहोत.
क्लिनिंग एडिक्शन म्हणजे वास्तवास हाइजिन मेंटेन करण्यापेक्षा अधिक आहे. ही एक प्रकारची मानसिक आरोग्यासंबंधित चिंतेची बाब आहे. जी एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या खासगी रिलेशनशिपला इफेक्ट करू शकते. स्वच्छता करणे चांगली गोष्ट आहे. पण सतत स्वच्छतेबद्दल विचार करणे किंवा गरजेपेक्षा अधिक क्लिनिंक करण्याच्या कारणास्तव तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.
लक्षणे काय आहेत?
-अशी व्यक्ती जी स्वच्छतेसाठी अधिक वेळ आणि मेहनत करतो. ऐवढेच नव्हे तर संपूर्ण दिवस क्लिनिंग आणि वस्तू व्यवस्थितीत ठेवण्यातच घालवतो.
-जेव्हा आजूबाजूला अस्वच्छता असते आणि जो पर्यंत स्वच्छता केली जात नाही तो पर्यंत त्यांना बैचेन वाटते. अथवा एंग्जायटी होऊ शकते.
-व्यक्तीच्या अत्याधिक क्लिनिंगच्या सवयीमुळे नातेसंबंध किंवा नोकरी करण्यास समस्या येऊ शकतात.
-स्वच्छता नसेल तर व्यक्तीला त्रास होतो.
-ज्या व्यक्तींना क्लिनिंग एडिक्शन आहे त्यांना आपण स्वच्छता करण्यापासून रोखू सुद्धा शकत नाहीत.
हेही वाचा- Kitchen Tips : स्वयंपाकघरातील हटके टिप्स