Friday, February 7, 2025
HomeमानिनीCleaning Tips : खराब फॅन असा होईल स्वच्छ

Cleaning Tips : खराब फॅन असा होईल स्वच्छ

Subscribe

फॅन आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक ऋतूत फॅनचा वापर हॊतॊ. सततच्या वापरामुळे फॅनवर खूप धूळ जमा होते आणि योग्य वेळी लक्ष दिले नाही तर कालांतराने हा फॅन खराब होऊ लागतो. कमी स्पीड, अनावश्यक आवाज,कंपन, किंवा अचानक बंद होणे ही त्याच्या बिघाडाची काही सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे फॅन वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत गरजेच आहे. आज आपण जाणून घेऊयात खराब फॅन कसा स्वच्छ करायचा.

कोरड्या कापडाने

तुम्ही कोरड्या कापडाने धूळ स्वच्छ करू शकता किंवा मायक्रोफायबर कापडाने ब्लेडवरील धूळ काढू शकता. याने सहजपणे तुमचा फॅन स्वच्छ होईल.

ओल्या कपड्याने पुसणे

एका बादलीत कोमट पाणी आणि डिटर्जंट किंवा लिक्विड सोप घ्या आणि आता कपडा चांगला भिजवून आणि पिळून घ्या आणि ब्लेड स्वच्छ पुसा. नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या.

व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा

तुम्ही व्हिनेगर किंवा बेकिंग सोड्याच्या मदतीने देखील फॅन क्लीन करू शकता. 1 कप पाण्यात 1 ते 2 कप सफेद व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा. यामध्ये कपडा भिजवून, ब्लेड आणि मोटरजवळील भाग स्वच्छ करा. कोरड्या कपड्याने पुन्हा एकदा पुसून घ्या.

स्प्रे क्लीनर वापरणे

मार्केटमधील मिळणारे डस्ट रिमूव्हर स्प्रे किंवा ऑल-पर्पज क्लीनर फॅनच्या ब्लेडवर फवारा मारा काही मिनिटे राहू द्या आणि मग ओल्या कपड्याने पुसून टाका.

गरम पाण्यात डिशवॉशिंग

गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा पाणी गरम झाल्यानंतर, त्यात डिशवॉशिंग लिक्विड घाला आणि चांगले मिसळा. आता स्क्रबरच्या मदतीने सोल्युशनचे पाणी त्याच्या कव्हर आणि फॅनवर टाका आणि हळू हळू स्वच्छ करा.

फॅन नियमित स्वच्छ ठेवा

आठवड्यातून किमान एकदा फॅन स्वच्छ करा, त्यामुळे धूळ जास्त साचणार नाही आणि फॅन लवकर स्वच्छ होईल. जर फॅन खूप मळकट असेल तर ब्लेड काढून, साबणाच्या पाण्यात भिजवून, स्वच्छ धुवून वाळू काढू शकता.

हेही वाचा : Prachi Manjrekar


Edited By : Prachi Manjrekar

Manini