Monday, January 20, 2025
HomeमानिनीCleaning Hacks : घरच्या घरीच बनवा भांडी चमकवणारी पितांबरी

Cleaning Hacks : घरच्या घरीच बनवा भांडी चमकवणारी पितांबरी

Subscribe

दिवाळीच्या आधी आपण सगळेच आपलं घर चमकवण्याच्या पाठी लागलेलो असतो. परंतु या घराप्रमाणेच मंदिर आणि भांडी साफ असणंही खूप गरजेचं आहे. तसं तर तुम्हाला बाजारात तांबे-पितळासारखी भांडी चमकवण्यासाठी पितांबरी मिळू शकते. परंतु तुम्हाला माहित आहे का तुम्ही घरच्या घरीदेखील पितांबरी तयार करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही आणि हे करण्यात तुम्हाला जास्त कष्ट घ्यायचीही गरज नाही.

तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासूनच बाजारात मिळते तशी पितांबरी बनवू शकता. यामुळे तुमची धातूची भांडी आधीपेक्षा चांगली स्वच्छ होतील आणि सोन्यासारखी चमकूही लागतील.

घरी पितांबरी कशी बनवाल?

साहित्य :

गव्हाचे पीठ – 1 कप
पांढरं मीठ – 1 कप
सायट्रिक अॅसिड – 1/2 कप
साबण पावडर – 1/2 कप
बेकिंग सोडा – 1/2 कप
लाल माती – 1/2 कप

कृती :

तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा किंवा बेसनसुद्धा घेऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता.

आता यामध्ये पांढरं मीठ, सायट्रिक अॅसिड आणि साबणाची पावडर मिसळा. जर तुमच्याकडे सायट्रिक अॅसिड नसेल तर जेव्हा तुम्ही घरगुती पितांबरी पावडर वापराल तेव्हा तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबाचा रस पावडरमध्ये टाकू शकता.

लाल माती ही पर्याय म्हणून आहे. जर तुम्हाला ही माती मिळत नसेल तर तुम्ही नाही वापरलीत तरीदेखील चालेल. परंतु सोडा, पीठ, मीठ, सायट्रिक अॅसिड आणि साबण पावडर हे मुख्य साहित्य आहे.

हे सगळं एकत्र केल्यावर तुमची घरच्या घरीच पितांबरी पावडर तयार होईल. ज्याने तुम्ही देवघरातील भांडी अगदी लख्ख करू शकाल.

Cleaning Hacks: Make Pitambari that shines the dishes at home

कसा कराल पावडरचा वापर ?

देवघरातील भांड्यांमध्ये तेल आणि तूपामुळे चिकटपणा निर्माण होतो. यासाठी तुम्ही ही भांडी गरम पाण्यात 5 मिनिटांकरता भिजत ठेवा.

यानंतर तुम्ही घरी बनवलेली पितांबरी पावडर यावर शिंपडा आणि एका स्वच्छ स्क्रबरच्या मदतीने भांडी घासून घ्या.

जास्त मेहनत केल्याशिवायही तुम्हाला ही भांडी चमकताना दिसू लागतील. तुम्ही यांना सुकवून देवघरात पुन्हा वापरू शकता.

अन्य टिप्स :

तुम्ही लिंबाच्या साली सुकवून आणि त्यांची पावडर बनवून तीही पितांबरीसारखी वापरू शकता.

याशिवाय तांदळाच्या पिठामध्ये बेकिंग सोडा टाकूनही पितांबरी तयार केली जाऊ शकेल.

तुम्ही केवळ पावडर नव्हे तर व्हिनेगर आणि लिंबूरस यांच्यापासूनही लिक्विड पितांबरी बनवू शकता.

सूचना :

जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही पितांबरीचा वापर करत असताना हातामध्ये हातमोजे घालणं गरजेचं आहे. खरंतर यामध्ये असलेले अॅसिड आपल्या त्वचेवर परिणाम करू शकते. जर तुमची त्वचा कोरडी राहत असेल तर हातमोज्यांशिवाय या पावडरचा अजिबात वापर करू नका.

हेही वाचा : Diwali 2024 : दिवाळीच्या साफसफाईची सुरूवात कुठून, कशी करायची?


Edited By – Tanvi Gundaye

 

 

Manini