Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल कपडे इस्री करण्याच्या कंटाळा आल्यास फॉलो करा 'या' टीप्स

कपडे इस्री करण्याच्या कंटाळा आल्यास फॉलो करा ‘या’ टीप्स

Subscribe

काही कपडे असे असतात, खासकरुन कॉटनचे जे धुतल्यानंतर अधिक चुरगळल्यासारखे वाटतात. याच कारणास्तव ते इस्री करण्यास ही वेळ लागते. काही वेळेस इस्री केल्यानंतर ही कपडे चुरगळ्यासारखेच वाटतात. अशातच तुम्ही पुढील काही ट्रिक्स वापरुन कपड्यांना पटकन इस्री करु शकता.

पाण्याचा वापर

- Advertisement -


कपडे अधिक चुरगळलेले दिसत असतील तर तुम्ही त्यावर थोडे पाणि शिंपडा. त्यानंतर इस्री करा. यामुळे तुमचे कपडे लवकर इस्री होतातच आणि त्यावरच्या चुरगळलेल्या लाइन्स ही निघून जातात.

हेयर ड्रायर

- Advertisement -


काही वेळेस इस्री केलेले कपडे कपाटात ठेवल्यानंतर हलके चुरगळतता. यामुळे ते जेव्हा घालायचे असतात तेव्हा पुन्हा इस्री करावे का असे वाटत राहते. अशातच तुम्ही हेयर ड्रायरची मदत घेऊ शकता. यामुळे कपड्यांवरील रिंकल्स ही निघून जातील.

इस्री करण्याची योग्य पद्धत


कपड्यांना इस्री करण्यास काही वेळेस खुप वेळ लागतो. तसेच खुप मेहनत ही घ्यावी लागते. यामागील एक कारण असे ही असू शकते की, त्याचा योग्य पद्धतीने वापर न करणे. सर्वात प्रथम इस्री करण्याचे कपडे कोणत्या प्रकारचे आहेत ते पहा. जाड कापड असलेले कपडे असतील तर ते इस्री करण्यास थोडा वेळेच लागतो.

हँगरचा वापर करा


कपडे धुतल्यानंतर ते अधिक चुरगळू नयेत म्हणून तुम्ही हँगरचा वापर करु शकता. खासकरुन वॉशिंगमध्ये खुप कपडे आणि शर्ट-पँन्ड धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी हँगरचा वापर करा. यामुळे कपड्यांना अधिक रिंकल्स येणार नाहीत.

लेस असणारे कपडे


लेस असणारे कपडे प्रेस करण्यासाठी काही वेळेस वेळ लागतो. असे कपडे इस्री करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपर घेत त्यात ते कापड ठेवा आणि इस्री करा. परंतु इस्री यावेळी अधिक गरम करु नका. असे केल्याने लेस असलेले कपडे इस्री करण्यास अधिक वेळ लागणार नाही.


हेही वाचा- लिनेन साडीची अशी घ्या काळजी

- Advertisment -