Friday, April 19, 2024
घरमानिनीवयात येणाऱ्या मुलांबरोबर पालकांनी बेडरूम शेअर करू नये

वयात येणाऱ्या मुलांबरोबर पालकांनी बेडरूम शेअर करू नये

Subscribe

प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलांची खुप काळजी घेतात. त्यांना काय हवं-नकोय हे खासकरुन भारतीय संस्कृतीत फार पाहिले जाते. त्याचसोबत मुलं ही पालकांसोबत रात्री त्यांच्याच बेडरुममध्ये ही झोपतात. परंतु काही वेळेस आई-वडिल आणि मुलांचे एकत्रित झोपणे नुकसानदायक ठरु शकते. अशातच पालकांनी एका मर्यादेनंतर मुलांसोबत आपली बेडरुम शेअर करु नये असे म्हटले जाते. पण यामागील नक्की कारण काय आहे हेच आपण येथे जाणून घेऊयात.

तज्ञ असे सांगतात की, प्युबर्टी दरम्यान तुम्ही तुमच्या मुलांसोबत झोपणे बंद केले पाहिजे. ह अशी एक स्थिती असते जेव्हा तुमच्या मुलाच्या शरिर लैंगिक रुपात परिपक्व होत असते. प्युबर्टीची स्टेज सुरु होण्याचा मुलींमधील कालावधी हा ११ वर्ष तर मुलांचा १२ वर्ष असा असतो.

- Advertisement -

दरम्यान, मुलींमध्ये ८ ते १२ वर्षादरम्यान प्युबर्टी सुरु होणे सामान्य आहे. तर मुलांमधील प्युबर्टी ही वयाच्या ९ व्या वर्षी ते १४ वर्षादरम्यान सुरु होऊ शकते. प्युबर्टीच्या दरम्यान मुलांच्या शरिरात काही प्रकारचे बदल होत असतात. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही मुलांना स्पेस द्या.

- Advertisement -

जर तुम्ही मुलांसोबत झोपत असाल तर या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या की, त्यांना दिवसभर पुरेसा आराम मिळालेला आहे. तज्ञ असे सांगतात की, प्रत्येकाची झोप ही वेगवेगळी असते. काही वेळेस तुमची मुलं झोपेतून मध्येच सुद्धा उठतात. अथवा तुमचे मुलं बाजूला झोपले असेल तर तुम्हाला झोप येत नाही. अशा काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो.

तुमचे मुलं तुमच्याशिवाय झोपू शकत नाही तर तुम्ही त्याला दुसऱ्या बेडवर झोपण्यास सांगा. जेणेकरुन तेथे तो आरामात झोपेल आणि तुम्हाला ही कोणती चिंता वाटणार नाही. या व्यतिरिक्त तज्ञ असे ही सांगतात की, आई-वडिलांसोबत १२ महिन्यांपेक्षा कमी वयातील मुलांना झोपवू नये. कारण यामुळे SIDS (सडन इन्फेंट डेथ सिंड्रोम) आणि त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास त्यांच्या मृत्यूचा धोका वाढतो.


हेही वाचा- सासू-सुनेच्या नात्यात गोडवा टिकून राहण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी

- Advertisment -

Manini