घरलाईफस्टाईलNarali purnima special recipe: नारळी पौर्णिमेसाठी नारळी भाताची स्पेशल रेसिपी

Narali purnima special recipe: नारळी पौर्णिमेसाठी नारळी भाताची स्पेशल रेसिपी

Subscribe

श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की, दोन महिने बंद असलेला मच्छिमारांचा व्यवसाय पुन्हा सुरू होतो. नारळी पोर्णिमेला कोळी बांधव परंपरेनुसार समुद्राला नारळ अर्पण करतात. या सणानिमित्त नारळापासून बनणारे काही खास पदार्थ बनवले जातात.

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनविण्यात येतात. तर आज आपण नारळी भात कसा बनवला जातो, याची रेसिपी जाणून घेऊया.

- Advertisement -

साहित्य

तांदूळ- एक वाटी
गूळ-१ वाटी(गूळ किसलेला)
ताजे खिसलेलं खोबर-एक वाटी
तूप-३ चमचे
लवंग-३ ते ४
दालचिनी-२ छोटे तुकडे
जायफळ किसून- चिमूटभर
काजू-८ ते १०
वेलदोडे पावडर-१ ते २ चमचे
मीठ-चीमुटभर
गरम पाणी- २ वाट्या

- Advertisement -

कृती
सर्वात पहिला तांदूळ स्वच्छ धुऊन तांदळातील पाणी पूर्ण नितळून घ्यावे.

कुकर गैस वर ठेऊन त्यामध्ये तूप गरम करा.

तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू तळून एका डीश मध्ये काढूघ्या.

आता त्याच तुपामध्ये दालचिनी,लवंगा,वेलदोडे घालून ३ ते ४ सेकंद परतावे.

निथळलेले तांदूळ घालून परतून घ्यावे.

परतलेल्या तांदळामध्ये २ वाटी पाणी घालावे आणि मीठ घालून कुकरचे झाकण लावून २ शिट्या काढाव्यात.

कुकर थंड झाल्यानंतर भात खाली वर करून पूर्ण मोकळा करून घ्यावे.

आता एक दुसरं पातेलं किंवा कढई गरम करून गूळ घालून ते विरघळवून घावे.

गूळ विरघळल्या नंतर त्यामध्ये खिसलेल खोबरे घालून मीक्स करून घ्यावे.

मोकळा केलेला भात घालून मीक्स करावे.

काजू, वेलदोडे पावडर आणि जायफळ घालून ते सर्व मिश्रण एकजीव करावे.

वरून झाकण ठेऊन बारीक गैसवर ५ ते १० मिनिट वाफवून घ्यावे.
तुमचा खमंग असा नारळी भात तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -