कॉफी आणि चहा हे दोन लोकांचे आवडते पेय आहे. जे लोक चहाचे सेवन करत नाही त्यांना कॉफी प्यायला खूप आवडते. कॉफीमुळे सकाळची सुरूवात खूप चांगली होते. आरोग्यासाठी कॉफी खूप फायदेशीर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? कॉफी आपल्या आरोग्यासह केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आज आपण जाणून घेऊयात कॉफी केसांसाठी किती फायदेशीर आहे.
कॉफीचा वापर केसांसाठी कसा करावा?
- कॉफी आणि शॅम्पू मिक्स करून केस धुवा.
- कॉफी ग्राउंड्स ओल्या केसांना मसाज करा.
- कॉफी ग्राउंड्स टाळूमध्ये घासून घ्या आणि लांब केसांमध्ये घासून घ्या.
- कॉफीसह हेअर मास्क बनवा.
केसांना कॉफी कशी लावायची
कॉफी तेलात मिसळा
कॉफी पावडर तेलात मिसळून डोक्याला लावून घ्या. केसांच्या वाढीसाठी तुम्ही नारळ तेल किंवा आर्गन तेल वापरू शकता. एक चमचा कॉफी पावडरमध्ये २ चमचे तेल मिसळून पेस्ट बनवून घ्या.ते टाळूवर लावा आणि हलक्या हाताने घासून घ्या. आणि 10 मिनिटे ठेवल्यानंतर धुवा यामुळे कोंड्याची समस्या देखील दूर होते.
शॅम्पूमध्ये कॉफी पावडर मिक्स करा
तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्ये कॉफी मिक्स करू शकता. शॅम्पूमध्ये कॉफी पावडर किंवा शिजवलेली ब्लॅक कॉफी घालूनही केस धुता येतात. असे केल्याने, तुम्ही कमी खर्चात घरी कॉफी इन्फ्युज्ड शॅम्पू तयार करू शकता. या कॉफी शॅम्पूने केस धुतल्याने केस रेशमी आणि चमकदार होतील.
दही आणि कॉफी हेअर मास्क
दही आणि कॉफी हेअर मास्क केसांवर लावल्याने केसातील साचलेली घाण, मृत त्वचेच्या पेशी आणि टाळूवरील कोंडा दूर करण्यास मदत करते. हे हेअर मास्क केसांनाही मजबूत बनवते. हे हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात सुमारे 3 चमचे कॉफी पावडर घाला. आणि नंतर त्याची पेस्ट बनवा आणि डोक्याला लावा. 15 मिनिटे ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.
हेही वाचा : Beauty Tips : या घरगुती उपायांनी ओपन पोर्सची समस्या दूर होईल
Edited By : Prachi Manjrekar