Monday, January 20, 2025
HomeमानिनीMonsoon 2024 : पावसाळ्यात थंड की गरम पाण्याने करावी आंघोळ?

Monsoon 2024 : पावसाळ्यात थंड की गरम पाण्याने करावी आंघोळ?

Subscribe

पावसाळा अनेक जणांचा आवडीचा ऋतू. या दिवसात हवेत गारवा असल्याने बरेचजण थंड पाण्याने आंघोळ करतात, तर काही जण या ऋतूतही थंड पाण्याने आंघोळ करण्यालाच प्राधान्य देतात. खरं तर, पावसाळयात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने याबाबत अद्यापही संभ्रम दिसून येतो. पावसाळा म्हटले की, अनेक आजार डोके वर काढू लागतात. या दिवसात बरेच जण आजारी पडतात. त्यामुळे या ऋतुत आयुर्वेदानुसार थंड की गरम पाण्याने आंघोळ करावी हे जाणून घेऊयात,

सर्वात पहिले तर वयानुसार आंघोळीसाठी पाणी निवडा. आंघोळीसाठी गरम किंवा थंड पाणी निवडताना तुमचे वय लक्षात घ्या. लहान मुले आणि वृद्धांनी आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा तर किशोरवयीन मुले व 45 वर्षांखालील व्यक्तींनी थंड पाण्याचा वापर करू शकतात. वर्किंग वूमेन असणाऱ्या व्यक्तींचे कामावर लक्ष केंद्रित असणे आवश्यक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे एकाग्रता वाढविण्यास थंड पाण्यामुळे मदत होते.

आयुर्वेदानुसार माणसाचे शरीर वात, कफ आणि पित्त अशा तिने प्रकारच्या प्रवुत्तीचे असते. त्यांच्या समतोल बिघडल्याने लोक आजारांना बळी पडू लागतात. त्यामुळे तुम्ही जर पित्त प्रवुत्तीचे असाल तर थंड पाण्याने आंघोळ करावी, तर वात आणि कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गरम पाण्यानेच आंघोळ करावी.

जर तुम्हा लिव्हर किंवा पचनाच्या संबंधित समस्या असतील तर आयुर्वेदानुसार असे आजार पित्तदोषामुळे होतात. अशावेळी तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करायलाच हवी. शरीरातील वात आणि कफ अनियंत्रित झाल्यावर व्यक्तीला पाय दुखणे, संधिवाताच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी गरम पाण्यानेच आंघोळ करावी.

आंघोळीची वेळही महत्वाची –

पावसाळ्यात गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ करण्यापूर्वी आंघोळीच्या वेळेकडेही लक्ष द्यावे. सकाळी आंघोळ करायची असल्यास थंड पाण्याचा वापर करू शकता. पण, रात्री आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करायला हवा. रात्री हलक्या कोमट पाण्याने आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो. थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. पण, या ऋतूत जास्त थंड किंवा जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं टाळावे. तुम्ही जास्त करून या ऋतूत कोमट पाण्यानेच आंघोळ करावी. यामुळे वातावरणातील थंडाव्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही किंवा जास्त गरम पाण्यामुळे तुमची स्किन ड्राय होणार नाही.

 

 

 


हेही पहा : Reasons You Should Avoid Getting Wet In First Rain : पहिल्या पावसात भिजणं का टाळावे ? पहा कारण

Edited By – Chaitali Shinde

Manini