Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyकॉम्बिनेशन स्किनची अशी घ्या काळजी

कॉम्बिनेशन स्किनची अशी घ्या काळजी

Subscribe

सर्वसामान्यपणे तुम्ही ड्राय स्किन, ऑयली स्किन अथवा सेंसिटिव्ह स्किन बद्दल ऐकले असेल. विविध स्किन टाइपची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मात्र काही लोकांची स्किन पूर्णपणे ड्राय किंवा ऑयली नसेत. कधीकधी ती ऋतूनुसार बदलली जाते. तर कधी चेहऱ्यावरील काही भाग तेलकट आणि ड्राय होते. अशा स्किनला एक्सपर्ट्स कॉम्बिनेशन स्किन असे म्हणतात. या स्किनची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

कॉम्बिनेशन स्किनची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी मार्केटमध्ये मिळणारे आर्टिफिशियल प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी घरगुती उपायांनी चेहऱ्यासाठी फेस पॅक तयार करू शकता.

- Advertisement -

Combination Skin: What It Is & How To Manage It | Eminence Organic Skin Care

मध आणि लिंबूचा फेस पॅक
मध आणि लिंबूचा फेस पॅक तुमच्या कॉम्बिनेशन स्किनसाठी फायदेशीर ठरेल. कारण यामध्ये काही नैसर्गिक गुण असतात जे स्किनची काळजी घेतात. मध तुमच्या स्किनला पोषण देते आणि त्वचा मॉइश्चराइज करते. त्याचसोबत मधात अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात जे त्वचेची काळजी घेतात. एक्नेच्या समस्येपासून दूर रहाता.

- Advertisement -

दुसऱ्या बाजूला लिंबात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे त्वचेचा रंग उजळ करण्यास मदत करते. त्याचसोबत लिंबात अँन्टीऑक्सिटेंड्स असतात जे त्वचेला नरिश करतात.

दही आणि गुलाबजामचा फेस पॅक
दह्यात प्री-बायोटिक्स असतात. जे त्वचेची काळजी घेण्यास ती हेल्थी ठेवण्यास मदत करते. दही स्किनला मॉइश्चराइज करते आणि मऊ बनवते. तर गुलाबजल चेहऱ्यासाठी फायदेशीर असते. कारण यामध्ये अँन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे स्किनला इंन्फेमेशन कमी करण्यास मदत करते. गुलाबजल स्किनला टोन आणि क्लिंज करण्यास मदत करते.


हेही वाचा- दह्याच्या ‘या’ चार फेसपॅकने त्वचा होईल नितळ

- Advertisment -

Manini