सामान्य बटरच्या तुलनेत पीनट बटर आहे परिपूर्ण; दररोज करा सेवन

ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु यातील काही ड्राय फ्रुट्सची किंमत खूप जास्त असते. ज्यामुळे प्रत्येकजण हे खरेदी करु शकत नाही. परंतु काही ड्राय फ्रुट्स असे आहेत ज्याची किंमत खूप कमी असते आणि त्यात पोषकतत्व देखील भरपूर असतात. त्यांपैकीच एक म्हणजे शेंगदाणे. अलीकडच्या काळात शेंगदाण्यांपासून तयार केलेले पीनट बटरचा अनेकजण वापर करतात. पीनट बटर चविष्ट आणि पौष्टक असते. तसेच याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत.

पीनट बटर कसे तयार केले जाते

घर पर बेस्ट क्वालिटी का पीनट बटर बनाने का तरीका, 10 मिनट में हो जाएगा रेडी  | homemade peanut butter recipe in hindiपीनट बटर बनवण्याची पद्धत सामान्य बटरपेक्षा वेगळी असते. सर्वात आधी शेंगदाणे भाजले जातात त्यानंतर त्यात मध, मीठ आणि शेंगदाण्याच्या तेलासोबत इतर काही पदार्थ टाकून मिक्स केले जाते. त्यामुळे यामध्ये अनेक पोषकतत्व असतात. ज्याचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात.

पीनट बटर खाण्याचे फायदे

होममेड पीनट बटर रेसिपी

हृदय निरोगी राहते
पीनट बटरमध्ये पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जेणेकरुन आपले हृदय निरोगी राहते.

हाडं मजबूत ठेवण्यासाठी
पीनट बटरमध्ये आयर्न आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात.

ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते
पीनट बटर ब्लड प्रेशर आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये मॅग्नीशियम आणि फायबरसारखे पोषकतत्व जास्त प्रमाणात असतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर
डोळ्यांसाठी व्हिटॅमीन ई खूप महत्त्वाचे मानले जाते. जे डोळ्यांशी संबंधित त्रास कमी करते. पीनट बटरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन ई असते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी
पीनट बटरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात. ज्याचे सेवन केल्याने लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.


हेही वाचा :

सावधान! ‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही दिसू शकता कुरुप