Saturday, March 15, 2025
HomeमानिनीHealthConcentration Tips : एकाग्रता वाढवणाऱ्या ब्रीदिंग एक्सरसाइज

Concentration Tips : एकाग्रता वाढवणाऱ्या ब्रीदिंग एक्सरसाइज

Subscribe

आजच्या वेगवान जगात, एकाग्रता राखणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अभ्यास असो, काम असो किंवा कोणतीही क्रिएटिव्ह काम असो, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आपली कामगिरी सुधारण्यास मदत करते.
अशा परिस्थितीत, ब्रीदिंग एक्सरसाइज करणे हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. या तंत्रामुळे केवळ ताण कमी होत नाही तर मन शांत करून एकाग्रता वाढविण्यास मदत होते. आजच्या या लेखात जाणून घेऊयात अशा काही प्रभावी एक्सरसाइजबद्दल.

खोल श्वास घेणे (Deep Breathing)

Concentration Tips : Breathing exercises that increase concentration

खोल श्वास घेणे ही सर्वात सोपी आणि प्रभावी तंत्रांपैकी एक पद्धत आहे. हे करण्यासाठी, प्रथम आरामदायी स्थितीत बसा. डोळे बंद करा आणि हळूहळू श्वास घ्या. तुमच्या पोटात श्वास भरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे पोट फुगेल. नंतर, तोंडाद्वारे हळूहळू श्वास सोडा. ही प्रक्रिया 5 ते 10 वेळा पुन्हा करा. या तंत्रामुळे मेंदूला ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित होते आणि मानसिक संतुलन योग्य राखण्यास मदत होते.

नाडी शोधन प्राणायाम (Alternate Nasal Breathing)

Concentration Tips : Breathing exercises that increase concentration

नाडी शोधन प्राणायाम ही एक प्राचीन योग पद्धत आहे जी मन शांत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करते. हे करण्यासाठी, प्रथम आरामात बसा आणि तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याने तुमची उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि नंतर उजव्या नाकपुडीतून बोटाने डावी नाकपुडी बंद करून श्वास सोडा. यानंतर, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. ही प्रक्रिया 5 ते 10 मिनिटे पुन्हा करा. हे तंत्र मेंदूच्या दोन्ही भागांना संतुलित करते, ज्यामुळे लक्ष केंद्रित होते .

4-7-8 ब्रीदिंग टेक्निक (4-7-8 Breathing Technique)

Concentration Tips : Breathing exercises that increase concentration

4-7-8 श्वास घेण्याची पद्धत ताण कमी करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे करण्यासाठी, प्रथम आरामात बसा आणि जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागे ठेवा. आता नाकातून श्वास घ्या आणि मनात 4 पर्यंत आकडे मोजा. मग श्वास रोखून 7 पर्यंत मोजा. यानंतर, तोंडाने श्वास सोडा आणि 8 पर्यंत मोजा. ही प्रक्रिया 4 ते 5 वेळा पुन्हा करा. हे तंत्र मन शांत करून एकाग्रता वाढवण्यास मदत करते .

भ्रामरी प्राणायाम (Bhramari Pranayama)

Concentration Tips : Breathing exercises that increase concentration

भ्रामरी प्राणायाम ही एक अशी पद्धत आहे जी मनाला शांत करण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. हे करण्यासाठी, आरामात बसा आणि डोळे बंद करा. आता तुमच्या दोन्ही हातांची बोटे तुमच्या डोळ्यांवर ठेवा आणि अंगठ्याने कान बंद करा. त्यानंतर, “ओम” उच्चारत नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. ही प्रक्रिया 5 ते 7 वेळा पुन्हा करा. हे तंत्र मेंदूच्या नसा शांत करते आणि आपले लक्ष केंद्रित करते.

हेही वाचा : Weight Loss Tips : वेट लॉससाठी ऍनिमल योगासने बेस्ट


Edited By – Tanvi Gundaye

Manini