घरताज्या घडामोडीआजार अंगावर काढल्याने कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर होते. आजार अंगावर काढू नये...

आजार अंगावर काढल्याने कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर होते. आजार अंगावर काढू नये म्हणजे नक्की काय करायचे?

Subscribe

आजार अंगावर काढल्यानेच अनेकदा कोरोना रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे योतो त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरही काहीच करु शकत नाहीत.

राज्यासह देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाल आहे. वेळीच रोगाचे निदान करा, वेळीच उपचार घ्या असे आपल्याला वारंवार सांगितले जात आहे. कोरोनापासून बचावासाठी त्याचे वेळीच निदान होणे सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र आपल्याकडे अनेकदा आजार अंगावर काढले जातात. केवळ कोरोना काळातच नाही तर इतरही आजारही बरेच जण अंगावर काढतात. आजार अंगावर काढल्यानेच अनेकदा कोरोना रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे योतो त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरही काहीच करु शकत नाहीत. आजार अंगावर काढणे म्हणजे काय? आजार अंगावर काढू नये म्हणजे नेमके काय करायचे? जाणून घ्या.

आजार अंगावर काढणे म्हणजे काय?

आजार अंगावर काढणे याचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे आजाराकडे दुर्लक्ष करणे. बऱ्याचदा सर्दी खोकल्या सारख्या सामान्य आजारांकडेही आपण दुर्लक्ष करतो. मात्र पुढे त्याचे गंभीर परिणाम होतात. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळातही किंवा आधीही एखाद्या आजारावर घरगुती उपचार करुन आजार बरा होईल अशी समजूत घालून दुखणी अंगावर काढली जातात. कोरोनाच्या काळातही सौम्य लक्षणे असलेले रुग्ण भितीपोटी घरच्या घरीच औषधे घेऊन किंवा बऱ्याचदा सर्रासपणे दुर्लक्ष करुन आजारपण अंगावर काढतात.

- Advertisement -

आजार अंगावर काढू नये म्हणजे नेमके काय करायचे?

आजार अंगावर काढू नये म्हणजे आजारावर योग्य वेळी योग्य उपचार घेणे. कोरोना महामारीत हे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना हा श्वसनाद्वारे होणार आजार आहे. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास वेळीच निदान करणे महत्त्वाचे आहे.

  • श्वसानाचे विकार असलेल्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येताना संसर्ग होणार याची काळजी घ्यावी.
  • ताप,सर्दी ,खोकला अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
  • तुमच्या शरीराची योग्य काळजी घ्या, नियमित व्यायाम करा त्याचबरोबर रोज सकस आहार घ्या.
  • कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास अँटीजेन टेस्ट किंवा RTPCR टेस्ट करुन घ्या.
  • त्याचप्रमाणे आपल्या आजाराशी डॉक्टरांशी व्यवस्थित चर्चा करावी.
  • इतरांचे ऐकून कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून कोणत्याही घरगुती उपायांवर अवंलब करुन आजार अंगावर काढू नका.

    हेही वाचा – गरम पाण्याची अंघोळ, गरम पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही? केंद्राचे स्पष्टीकरण

 

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -