जर तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुमचा आदर करत नसतील किंवा तुमचे विचार, सूचना फार गांभिर्याने घेत नाहीत असे तुम्हाला वाटतं का? मग याचा अर्थ समोरची व्यक्ती तुम्हाला कायम गृहीत धरत आहे. तुम्ही त्यांना जेवढा आदर देता किंवा त्यांची काळजी घेता त्या मोबदल्यात समोरची व्यक्ती जर तुमची तेवढी काळजी घेत नसेल आणि याचं तुम्हाला काहीही वाटत नसेल तर तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात हे समजून जा. जर तुमच्यासोबत असे घडत असेल, तर तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करण्याची वेळ आली आहे जेणेकरून समोरच्याला तुमची किंमत समजू लागेल.
मर्यादा :
तुम्हाला जर तुमच्याबद्दल समोरच्यांच्या भूमिका बदलायच्या असतील तर सर्वात आधी तुमच्या स्वभावात बदल करा. समोरच्यांना सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टी सहन होणार नाहीत. तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर स्वतःसाठी आवाज उठवा आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.
मदत :
तुम्ही न मागता मदत केली तर मदत घेणाऱ्या व्यक्तीला ते कळत नाही. म्हणून, जोपर्यंत कोणी मदतीसाठी विचारत नाही तोपर्यंत मदत करू नका. अशा लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.
वैयक्तिक गोष्टी :
कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकजण चांगला आणि दयाळू नसतो, म्हणून आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय, तुमच्या उणीवा ओळखून दुसरी व्यक्ती त्याचा फायदा घेऊ शकते.
ऐकू नका :
प्रत्येकाचे म्हणणे ऐकायलाच हवे हे आवश्यक नाही. अशा परिस्थितीत, आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपण सर्वांचे ऐकले पाहिजे आणि आपल्या मनाचे अनुसरण केले पाहिजे. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडा. स्वतःचा आदर करा तरच समोरची व्यक्ती तुमचा आदर करेल.
हेही वाचा : Office Vastu Tips : प्रगतीसाठी ऑफिस डेस्कवर ठेवा या वस्तू
Edited By – Tanvi Gundaye