Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthरात्री बेरात्री भूक लागते? मग खा 'हे' हेल्दी पदार्थ

रात्री बेरात्री भूक लागते? मग खा ‘हे’ हेल्दी पदार्थ

Subscribe

दिवसभर कितीही खाल्लं तरी रात्री बऱ्याच जणांना रात्री उशिरा भूक लागते. मात्र, उशिरा भूक लागल्यावर काय खायचे हा प्रश्न पडतो. रात्री अपरात्री बऱ्याचदा आपण नको ते पदार्थ खातो. मात्र, त्या पदार्थांमुळे आपले वजन वाढू शकते. अशावेळी काही हेल्दी आणि सहज पचतील अशा पदार्थांचे सेवन करायला हवे.

  • मखाणा

Makhana Seeds | Lotus Seeds / Foxnuts / Phool makhana

- Advertisement -

मखाणा हा पदार्थ तयार करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. मंद गॅसवर मखाणा भाजून तुम्ही खाऊ शकता. रात्री भूक लागल्यास मखाणा तुमची भूक भागवू शकतो. शिवाय तो पचायला हलका असून त्याने पोटही लवकर भरते.

  • नाचणीचे पापड

Premium Photo | Ragi or nachni papad or fryums made using nagali, it is a crispy and spicy poppadom made from nachani

- Advertisement -

रात्री उशिरा भूक लागल्यास नाचणीचे पापड खा. नाचणीचे पापड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फक्त हे नाचणीचे पापड भाजलेले असतील याची काळजी घ्या. नाचणीच्या पापडाने आपल्या शरिरात हेल्दी पदार्थ जातात आणि आपली भूकही भागते.

  • फळे

How to Select Ripe Fruit | HowStuffWorks

 

मध्यरात्री जर अचानक भूक लागली तर फळे खाणे कधीही उत्तमच आहे. यामुळे तुमची भूकही भागेल आणि वजनही वाढणार नाही.

  • ड्रायफ्रूट्स

Dry Fruits

ड्रायफ्रूटमध्ये प्रोटीन, फायबर असते ज्यामुळे आपल्या शरिराला आवश्यक असलेले प्रोटीन मिळतात. रात्री जर भूक लागली तर बदाम, काजू, मनुके तुम्ही खाऊ शकता.

 


हेही वाचा :

- Advertisment -

Manini