Saturday, December 2, 2023
घरमानिनीHealthपोट सतत गडबडतंय? मग खा काळे मनुके

पोट सतत गडबडतंय? मग खा काळे मनुके

Subscribe

हिवाळा ऋतू अनेकांचा आवडता असला तरी या ऋतूमध्ये विविध आजारांचा धोका वाढतो. वाढत्या आर्द्रतेमुळे बुरशी आणि जीवाणूंची मोठ्याप्रमाणात वाढ होते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. बुरशी आणि बॅक्टेरियामुळे अनेक आजार होतात. मात्र, हिवाळ्यात मनुके आणि दूध पिऊन तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता.

यामध्ये पॉलिफेनॉल्स, फायबर, प्रोटीन, अँटी-ऑक्सिडेंट्स, पोटॅशियमसह अनेक पोषक घटक असतात. यामुळे मनुके दुधासोबत खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

- Advertisement -

काळ्या मनुके खाण्याचे फायदे

Dried Black Currant - Complete Information Including Health Benefits, Selection Guide and Usage Tips - GoToChef

  • मनुक्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. याच्या सेवनाने गॅस, पोटं फुगणे, बद्धकोष्ठता आणि अपचन अशा अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढते, त्यासोबतच आतड्याचे आरोग्यही चांगले राहते.
  • मनुके मधुमेह, अल्झायमर, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. मनुके पाण्यात भिजवून ते पाणी पिल्याने शरीर मजबूत राहते.
  • मनुक्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते. पचनसंस्थेशी संबंधित आजारांवर औषध म्हणूनही याचा उपयोग होतो. मनुक्यामध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आढळतात.
  • व्हिटॅमिन-सीमुळे मनुके शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मनुके गरम दुधात टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते.

हेही वाचा :

थंडीत तुमचंही अंग ठणकतं का? करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini