वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यात व्यायाम, डायटिंग या दोन मुख्य गोष्टी आहेत. डायटिंग करताना अनेकजण खाण्या-पिण्यात मोठ्या प्रमाणात बदल करतात. ज्यात फक्त फळं, फळांचा रस आणि सॅलड खातात. मात्र, यामुळे वजन कमी होत असले तरी शरीराल हवी तेवढी एनर्जी मिळत नाही. संपूर्ण आहाराशिवाय शरीराला पोषकतत्व मिळत नाहीत. वजन कमी करताना तुम्ही चपाती, भाकरी, भाज्या, भात देखील खाऊ शकता असं हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात. यासाठी तुम्ही हलक्या डाळीचे सेवन देखील करु शकता.
वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ डाळीचे सेवन
- वजन कमी करण्यासाठी तसेच डायटिंगमध्ये शरीराला पुरेसे पोषकतत्व मिळण्यासाठी पिवळ्या मूगाची डाळ हा उत्तम पर्याय आहे.
- या डाळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तसेच ही पचायला हलकी देखील असते. शिवाय यामुळे कफ देखील होत नाहीत. तसेच यामूग भूक देखील लवकर लागत नाही.
- डाळीतील फायबर खराब कोलेस्ट्रॉलचे संचय रोखण्यास मदत करते.
- तसेच यामुळे हृदय देखील निरोगी राहते.
- या डाळीतील लोहाचा उत्तम स्तोत्र असल्याने ते लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यास मदत करते.
- तुम्ही वजन कमी करत असल्याचं आहारात या डाळीचा जास्तीत जास्त वापर करा.
- या डाळीचे तुम्ही वरण, सूप देखील बनवू शकता. तसेच डाळीचा डोसा देखील तयार करु शकता.