Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthचमकदार त्वचेसाठी करा 'या' ज्यूसचे सेवन

चमकदार त्वचेसाठी करा ‘या’ ज्यूसचे सेवन

Subscribe

चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी भाज्या आणि फळांचे ज्युस पिणे कधीही उत्तम मानले जाते. भाज्या आणि फळांच्या सेवनामुळे त्वचेसंबंधीत कोणातेही आजार दूर करण्यासाठी मदत होते. फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि पोषक तत्त्व असतात. या ज्युसमुळे शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत होते.

सुंदर त्वचेसाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

  • टोमॅटो ज्युस

How to Make Healthy Tomato Juice And Why You Must Drink It - YouTube

- Advertisement -

 

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सिडेंट तत्त्व असतात. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यास मदत होते. टोमॅटोमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते. दररोज एक ग्लास टोमॅटोच्या ज्युसचे सेवन केल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

- Advertisement -
  • गाजर-बीट ज्युस

Learn How Carrot and Beetroot Juice is Amazing for Diabetics | Real Activ

गाजर आणि बीट आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. यामध्ये पोटॅशिअम, फोलिक एसिड, मॅगनिज आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात असते. गाजर आणि बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात.

  • डाळींबाचे ज्युस

Pomegranate: Why This Fall Fruit is Worth Adding to Your Diet - Woman's  World

डाळींबामध्ये ब्लड प्युरीफाई करण्याची शक्ती असते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार होते. डाळींबाच्या ज्युसचे नियमित सेवन केल्याने त्वचा तजेलदार दिसते.

  • एलोवेरा ज्युस

Are There Health Benefits of Aloe Vera Juice? Nutritionists Explain

कोरफडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. यामुळे त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी बऱ्याचदा कोरफड वापरली जाते. कोरफडमध्ये ऑक्सिन नावाचे हार्मोन असते जे आपल्या त्वचेला उजळ बनवते. त्यामुळे कोरफडीच्या ज्युसचे नियमित सेवन करा त्यामुळे त्वचेला खूप फायदा होईल.

 


हेही वाचा :

उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात

- Advertisment -

Manini