Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthहिवाळ्यात उपाशीपोटी करावे 'या' पदार्थांचे सेवन

हिवाळ्यात उपाशीपोटी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

Subscribe

आपण सकाळी उठल्यापासून जे काही खातो त्यावरच आपले आरोग्य अवलंबून असते. सकाळच्या नाश्तामध्ये अनेकजण हेल्दी पदार्थ खातात. थंडीच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. थंडीच्या काळात व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता सर्वाधिक असते. यासोबतच, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे ताप,सर्दी इत्यादी समस्या वाढतात. त्यामुळे अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती निरोगी राहील आणि शरीर उबदार होण्यास मदत होईल.

उपाशीपोटी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

  • बदाम

What's More Beneficial: Soaked or Raw Almonds?- 24 Mantra Organic

- Advertisement -

बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 सारख्या घटकांनी समृद्ध आहे. त्यामुळे बदाम रात्री पाण्यात भिजत ठेऊन सकाळी त्याचे सेवन करावे. जेणेकरुन, तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होईल.

  • कोमट पाणी

12 Incredible Benefits of Drinking Honey Lemon Water

- Advertisement -

 

सकाळी उठल्या उठल्या एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात लिंबू आणि थोडं मध घालून प्यावे. त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि पचनसंस्था नीट काम करते. याशिवाय याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.

  • पपई

Papaya side effects: These people should avoid eating it | HealthShots

पपई पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी याचे सेवन केल्याने आतडे व्यवस्थित स्वच्छ होतात, ज्यामुळे  बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच वजनही कमी होते.

  • अंजीर

5 Surprising Health Benefits Of Anjeer (Fig) Water - NDTV Food

हिवाळ्यात ड्रायफुट खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी 2 अंजीर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी पाण्यासोबत सेवन करा. त्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळते.

 

 


हेही वाचा  :

 

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

- Advertisment -

Manini