Wednesday, April 17, 2024
घरमानिनीHealthया फळांचे एकत्र सेवन केल्याने होऊ शकते गंभीर समस्या

या फळांचे एकत्र सेवन केल्याने होऊ शकते गंभीर समस्या

Subscribe

फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. फळांमध्ये असलेल्या जीवनसत्व आणि खनिजांमुळे शरीरास आवश्यक पोषकतत्वे मिळतात. तसेच शरीरातील मिनरल्स आणि व्हिटामिन्सची कमतरता दूर करते. त्यामुळे आहारात फळांचा समावेश करावा. परंतु तुम्हाला ठाऊक आहे की, काही फळे एकत्र खाल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

ही फळं कधीही खाऊ नका एकत्र

  • पेरु आणि केळ

Banana guava Images - Search Images on Everypixel

- Advertisement -

पेरू आणि केळ  एकत्र खाण्याची चूक केव्हाही करु नका. कारण डॉक्टरांच्या मते, ही दोन्ही फळं एकत्र खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या वाढू शकते. तसेच पोटदुखी आणि सतत डोकेदुखीची समस्या जाणवू लागते.

  • पपई आणि लिंबू

Papaya and lemon

- Advertisement -

पपई आणि लिंबू हे एक डेडली कॉम्बिनेशन मानले जाते. त्यामुळे पपई आणि लिंबू एकत्र खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. तसेच पपई आणि लिंबू मिश्रणामुळे अॅनिमिया (शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा आजार) आजारासंबंधीत प्रकरणे वाढू शकतात.

  • संत्री आणि गाजर

Orange & Carrot Soup — Green Kitchen Stories

संत्री आणि गाजर एकत्र खात असाल तर जरा सावध राहा. कारण हे कॉम्बिनेशन मूत्रपिंडासंबंधीत आजारांना निमंत्रण करतात. तसेच यामुळे छातीत जळजळ आणि पित्तासंबंधीत आजार वाढू शकतात.

  • डाळिंब आणि जर्दाळू

Pomegranate: Benefits, Nutrition, and Facts

डाळिंब आणि जर्दाळू ही फळं हाई शुगर आणि प्रोटीन्सनी परिपूर्ण असतात. त्यामुळे ही फळं एकत्र खाल्ल्याने अॅसिडीटी, अपचन, छातीत छळछळ यांसारख्या समस्या जाणवू लागतात. तसेच यातील हाई शुगर प्रोटीन्स शरीरातील एन्जाइम्सचे प्रमाण कमी करतात.

  • फळं आणि भाज्या

How to Eat More Fruit and Vegetables | American Heart Association

फळांबरोबरच विविध प्रकारच्या भाज्याही एकत्र खाणे टाळा. कारण फळांमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे भाज्यांसह फळ खाल्ल्याने पचन क्रियेस अडथळा निर्माण होतो. तसेच शरीरात विविध प्रकारचे टॉक्सिन तयार होतात. याशिवाय डायरिया, डोकेदुखी आणि इंफेक्शनच्या समस्या वाढू लागतात.


हेही वाचा :

उन्हाळ्यात खावेत हे 5 सुपरफूड

- Advertisment -

Manini