जास्त प्रमाणात दूधाचे सेवन केल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या

Consuming too much milk can cause 'thise' problems

आपण जेवढा सकस आहार घेऊ तेवढंच आपलं शरीर सुद्दा निरोगी राहतं. शरीरात कॅल्शियमचा पुरवठा होण्यासाठी दूध हा उत्तम स्रोत असतो. दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. दुधामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक ठरू शकतो हे देखील खरे आहे. दुधाच्या बाबतीतही असेच आहे. जर आपण जास्त प्रमाणात दुधाचे सेवन करत असू तर त्याचे अनेक हानिकारक परिणाम देखील होऊ शकतात.

एका दिवसात किती दूध पिणे गरजेचे
जास्त प्रमाणात दूध पिणे शरीरासाठी अनेक प्रकारे घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत गरजेनुसार दुधाचे सेवन करणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, व्यक्तीने दिवसातून एक किंवा दोन ग्लास दूध प्यावे. याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पनीर, मठ्ठा, दही हे दुधाचे पदार्थ पाहू शकता.

समस्या –

शरीरात सुस्ती
काही जणांना एकतर दूध आवडत नाही किंवा त्यांना त्याची ऍलर्जी आहे. अशा परिस्थितीत दुधाचे अतिसेवन कधी कधी अशा लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. अनेक वेळा दूध प्यायल्याने अस्वस्थता, मळमळ, थकवा आणि सुस्ती यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

पचन समस्या
दुधाच्या सेवनाने अनेक वेळा पोट बिघडते. दुधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मळमळ आणि अस्वस्थ वाटू शकते. दूध जड असते त्यामुळे ते पचायला वेळ लागतो, ज्यामुळे काही वेळा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

हाडे कमकुवत होऊ शकतात
हाडांच्या मजबूतीसाठी दूध हा एक चांगला स्रोत आहे. पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने उलट देखील होऊ शकते. खरं तर, ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये 2014 च्या अभ्यासात असे आढळून आले की जे लोक कमी दूध घेतात त्यांना हाडे दुखण्याची समस्या होऊ शकतात.

त्वचेच्या समस्या
दुधाचे जास्त सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात. यामुळे चेहऱ्यावर किंवा त्वचेच्या इतर भागांवर ऍलर्जी होऊ शकतात.

कर्करोगाचा धोका
एका अभ्यासानुसार, कॅल्शियमने युक्त दूध जास्त प्रमाणात घेतल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो. अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चने २००७ साली दिलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. याशिवाय 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या NCBI च्या अहवालात असे सांगण्यात आले होते की, दुधामध्ये लैक्टोज नावाची साखर आढळते, त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते.

या संबंधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता.


हे ही वाचा – हिवाळ्यात सोप्या पध्द्तीने बनवा पौष्टिक मेथी लाडू