Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthभाताचे अतिसेवन ठरेल घातक

भाताचे अतिसेवन ठरेल घातक

Subscribe

भारतात अनेकजण खूप आवडीने भात खातात. काही लोक त्यांच्या आहारात चपातीऐवजी केवळ भाताचा समावेश करतात. खरंतर चपाती किंवा भाकरीऐवजी भात बनवणं देखील खूप सोपं आहे. मात्र, काही लोक असेही आहेत, जे भाताला हातही लावत नाहीत. कारण, भात खाल्ल्याने त्यांचे वजन वाढते. ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, जास्त प्रमाणात भात खाणं देखील शरीरासाठी घातक ठरु शकतं.

जास्त प्रमाणात भाताचे सेवन ठरेल घातक

How To Cook Rice—A Step-By-Step Guide And Recipe

- Advertisement -
  • साखरेची पातळी वाढते

भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी भाताचे सेवन जास्त करू नये.

  • वजन वाढते

शिजवलेल्या भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे दररोज भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भात मर्यादित प्रमाणात खावा.

- Advertisement -
  • पोट फुगण्याची समस्या

भात खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि पोट फुगण्याची समस्याही दिसू लागते. भात खाल्ल्यानंतर लगेच झोपणे योग्य नाही. मात्र, भाताचे वैशिष्ट्य म्हणजे तो लवकर पचते. यामुळे तुम्हाला पुन्हा भूक लागायला लागते आणि तुम्ही दिवसभर काही ना काही खात राहता. यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

The Cooking Assumption That's Ruining Your Brown Rice

 

 

  • गॅसची समस्या

जर तुम्ही भात खाण्याची शौकीन असाल, तर पांढऱ्या तांदळाऐवजी तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता. हे तांदूळ जास्त आरोग्यदायी असतात. पांढऱ्या तांदळात फायबरचे प्रमाण जास्त नसते. अशा स्थितीत ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते. कधीकधी पोट जड आणि फुगलेले देखील दिसते.

  • आळश जाणवतो

ऑफिसमध्ये किंवा घरी जेवणाच्या वेळेत पोटभर भात खाल्ल्यास जेवल्यानंतर काही वेळातच झोप येऊ लागते. असं यामुळे होतं कारण, तांदूळ शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो. भात खाल्ल्याने शरीर सुस्त होऊन आळस वाढतो.


हेही वाचा :

- Advertisment -

Manini