घरलाईफस्टाईलपालेभाज्या सतत गरम करणे धोकादायक

पालेभाज्या सतत गरम करणे धोकादायक

Subscribe

बहुतेक जण सकाळीच दोन्ही वेळच जेवण बनवतात. तर काहीवेळा सकाळी बनवलेली भाजी थंड झाल्याने रात्री आपण ती पुन्हा गरम करतो. मात्र ही सवय आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. कारण हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या अनेक भाज्या वारंवार गरम केल्याने पोषक तत्व गमावतात. तसेच ते विषारी होऊ लागतात. ज्याचे सेवन केल्याने शरीरात स्लो पॉयझनसारखा परिणाम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे पालेभाज्या सतत गरम करू नये असा सल्ला तज्ञ देतात.

Spinach Pictures [HQ] | Download Free Images on Unsplash पालेभाज्या सतत गरम का करू नये, ही आहेत त्याची कारणे

- Advertisement -

बऱ्यापैकी हिरव्या पालेभाज्या आणि गाजरासारखे जमिनीतून मिळणाऱ्या भाज्यांमध्ये नायट्रेट चांगल्या प्रमाणात आढळते. त्यामुळे या भाज्या जेव्हा पुन्हा पुन्हा गरम केल्या जातात तेव्हा नायट्रेटचे प्रमाण हे अधिक प्रमाणात वाढते ज्याने शरीराला हानी पोहोचते. नायट्रेट पुन्हा गरम केल्यावर विषारी बनते आणि या भाज्यामधून कार्सिनोजेनिक गुणधर्म बाहेर पडतात. म्हणजेच असे घटक जे शरीरात कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींच्या वाढीचे कारण बनू शकतात.

पालक सतत गरम का करू नये?

- Advertisement -

पालक एकदा शिजवल्यावर पुन्हा गरम करू नये कारण यात भरपूर प्रमाणात लोह असते आणि जेव्हा लोह जास्त गरम केले जाते तेव्हा त्याचे ऑक्सिडायझेशन होऊ लागते. जेव्हा लोहाचे ऑक्सिडायझेशन होते, तेव्हा त्यात मुक्त रॅडिकल्स तयार होतात, जे शरीरात प्रवेश करतात आणि अनेक घातक रोगांना कारणीभूत ठरू शकतात.

Water Spinach Images - Free Download on Freepik

भात पुन्हा पुन्हा गरम करू नका
भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. कारण भात थंड झाल्यावर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात.

बटाटे पुन्हा गरम करणे टाळा
जर तुम्ही बटाट्यापासून बनवलेली भाजी खात असाल किंवा बटाटे अनेक वेळा गरम केल्यावर फक्त उकळत असाल तर तसे करू नका. कारण बॅक्टेरियामुळे बोट्युलिझम नावाचा आजार होण्याचा धोका असतो.

उकडलेले अंडे पुन्हा गरम करू नका
उकडलेले अंडे जर तुम्ही रोज खात असाल तर फक्त ताजी अंडीच खावीत. तळलेले किंवा उकडलेले अंडे पुन्हा गरम केल्याने त्यांची प्रथिने नष्ट होतात. तसेच हे खाल्ल्यानेही पोटदुखी होऊ शकते.

मशरूम खात असाल तर शिजवा आणि लगेच खा
मशरूममध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात आणि ते शिजवल्यानंतर लगेच खावे. ते पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिने नष्ट होतात आणि पचनसंस्थेलाही हानी पोहोचते.

चिकन जास्त गरम करू नये
जर तुम्ही मांसाहाराचे शौकीन असाल तर अनेकजण एकाच वेळी अधिक चिकन शिजवतात आणि पुन्हा गरम करून खातात. पण असे केल्याने पचनास त्रास होऊ शकतो. तसेच चिकन फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर गरम करून खाऊ नका.

 


हेही वाचा ; Kitchen Tips : गृहिणींसाठी स्वंयपाक घरातील सोप्या टिप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -