Saturday, April 20, 2024
घरमानिनीहट्टी मुलांना कसे हाताळाल?

हट्टी मुलांना कसे हाताळाल?

Subscribe

चंदा मांडवकर :

 

- Advertisement -

लहान मुलांना हट्ट करण्याची खुप सवय असते. एखादे खेळणे दिसले की ते लगेच खरेदी करण्यास सांगतात. आपल्या आवडीच्या गोष्टी मिळवण्यासाठी ते भररस्त्यात ही रडतात, ओरडतात. अशातच आजूबाजूची लोक मुलाच्या पालकांकडे तर पाहतातच. पण हट्टी मुलाला सांभाळता येत नाही का असे ही बोलतात मुले हट्टी असतील तर पालकांना खुप समस्या येतात. मात्र शांतिने आणि धैर्याने तुम्ही मुलाची ही सवय नियंत्रणात आणू शकता. जर तुमचे मुलं आपली गोष्ट आणि हट्टासंदर्भात कायम असेल तर त्याला समजून घ्या. त्याचसोबत त्याच्यावर प्रत्येकवेळी रागवण्याऐवजी काही गोष्टी समजावून सांगा.

जी मुल खुप हट्टी असतात ती वारंवार प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारत राहतात. त्यांना आपले बोलणे प्रत्येकाने ऐकले पाहिजे असे वाटत असते हे वारंवार नखरे ही करतात. पण या सर्व गोष्टीवर पालकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. हट्टी मुलांना कसे सांभाळावे याच बद्दलच्या काही टीप्स पाहूयात.

- Advertisement -

वाद करण्यापासून दूर रहा

How to Discipline Your Stubborn Child - Baby Chick

हट्टी मुलांसोबत वाद करण्यापासून दुर रहा. याउलट प्रथम त्यांचे बोलणे ऐकून घ्या आणि जेव्हा तुम्हाला तो चुकीचा आहे असल्याचे वाटले तर त्याला समजावून सांगा. वाद केल्याने मुल अधिक चिडचिड करतात आणि यामुळे आपल्याला त्यांचा अधिक राग येतो.

ओरडू नका

1,421 Stubborn Child Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock  | Defiant child, Tantrum, Child saying no

पालकासाठी फार महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांवर प्रत्येक वेळी ओरडू नये, हट्टी मुलाला समजावून सांगण्यासाठी तुम्ही त्याच्या कलेने त्याला घ्या. जैये खरच गरज आहे तेथे ओरडा पण त्याचा त्याच्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करा. मुलाला चूक आणि बरोबर मधील फरक समजावून सांगा,

मुलासाठी नियम बनवा

Parenting Tips: जिद्दी बच्चे को मिनटों में कंट्रोल करने के लिए अपनाएं ये  टिप्स | Follow these tips to control a stubborn child in minutes in hindi -  Hindi Boldsky

हट्टी मुलांसोबत कसे वागावे असा प्रश्न पडला असेल तर त्यांच्यासाठी काही नियम तयार करा त्यांना नियम मोडल्यानंतर काय होईल याबद्दल ही सांगा तुम्ही वारंवार मुलासोबत कठोरपणे वागत असाल तर मुल तुमचे कधीच ऐकणार नाही. उलट तुमच्या विरोधातील मतं त्याच्या मनात निर्माण होतील. त्यामुळे जरी मुलासाठी नियम तयार करत असाल तर ते त्याच्यासाठी किती फायदेशीर असतील हे पहा

मुलांच्या मनातील ओळखा

6 Tricks To Control Your Temper With A Stubborn Child

काही वेळेस मुल आपल्या पालकांनी आपल्याकडे पहावे म्हणून हट्ट करत असतात. अशावेळी तुमचे मुल तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय का हे ओळखा. त्याच्याशी बोला मुलाशी शांतपणाने त्याला काही समस्या आहेत का हे सुद्धा जाणून घ्या. कारण मुलं काहीवेळेस आपल्या मनातील गोष्ट मीतीमुळे पटकन सांगत नाहीत.

हट्ट पुरवण्यापासून दूर रहा बहुतांश वेळा हट्टी मुल त्यांना हवे ते मिळवण्यासाठी काही करतात. अशातच पालकांना काहीवेळेस त्यांच्यावर दया दाखवत ते म्हणतील ते करतात. अशातच त्यांचा हट्टीपणा अधिक वाढतो आणि त्याला नियंत्रणात ठेवणे फार कठीण जाते. त्यामुळे ज्या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत त्या गोष्टी त्याच्यासाठी खरोखर खरेदी करा पण उगाच नको त्या वस्तूंचा हट्ट मुल करत असतील तर त्यांना वेळीच थांबवा आणि समजावून सांगा

मुलासोबत जबरदस्ती करु नका

ziddi bacho ko kaise control kare, बात-बात पर जिद करता है आपका बच्‍चा तो ये  टिप्‍स आएंगे आपके काम - how to handle stubborn child in hindi - Navbharat  Times

तुमचे मुल भले हट्टी असेल पण त्याच्याशी कधीच कोणत्या गोष्टीसाठी जबरदस्ती करु नका. यामुळे ते अधिक खोडकर आणि हट्टी होतात. जरी तुम्ही जबरदस्ती केल्यानंतर मुल तसे वागत असले तरीही पुढे जाऊन या कारणामुळे समस्या उद्भवू शकते. जबरदस्ती केल्याने मुल अशा काही गोष्टी करतात ज्यासाठी तुम्ही त्यांना त्या करण्यासाठी नकार दिलेला असतो. त्यामुळे नेहमीच मुलांशी बातचीत करा आणि त्याच्यासोबत मित्रत्वाचे नाते तयार करा.


हेही वाचा :

सिंगल राहण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini