जापान मधील ओकिनावा मध्ये काही लोक अशी आहेत ज्यांनी वयाची शंभरी गाठली आहे आणि ते खुप आनंदी आयुष्य जगत आहेत. लेखक डॅन ब्युटनर यांनी 20 वर्षांपेक्षा अधिक काळ हे जाणून घेण्यासाठी लावला की, ओकिनावा मधील लोक ऐवढे दीर्घायुष्य कसे जगतात?
डॅन असे मानतात की, ओकिनावा मधील स्थानिक लोक दीर्घायुष्य जगण्याचे कारण असे की ते प्लांट बेस्ड फूड्सचे सेवन करतात. असे फूड्स खातात ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. तर ओकिनावा मधील कुकिंग टीचर युकी मियागुनीने नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंट्री ‘लाइव टू 100: सीक्रेट्स ऑफ द ब्लू झोन’ मध्ये लेखकाला म्हटले की, अशी कोणती खास गोष्ट नाही ज्यामुळे त्यांचे वय वाढले जाते. ते नेहमीच फिट राहतात आणि कधीच औषधं घेत नाहीत.
जसे मला वाटते ही लोक त्यांच्या डाएटमध्ये अशा काही गोष्टी खातात त्यामुळे ते हेल्दी राहतात. तेच त्यांच्या दीर्घायष्याचे सीक्रेट असेल कुक मियागुनीने पुढे सांगितले.
ओकिनावा मध्ये जेवण कमी केले जात असल्याने 1950 च्या आसपास येथील लोक आपल्या दैनंदिन कॅलरीच्या 67 टक्के हिस्स्यात पर्पल स्वीट पोटॅटोज खातात. त्याला ही लोक बेनी इमो असे म्हणतात. यामध्ये फाइबर आणि अँन्टीऑक्सिडेंट्स असतात. त्याचसोबत तुतीची पाने खाल्ल्याने घशात होणारी खवखव कमी होते. रिसर्च असे सांगते की, यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. ब्लड शुगर यामुळे कमी होते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास ही मदत होते.
या व्यतिरिक्त स्क्विड इंक सूप मध्ये एंजाइम, अमीनो अॅसिड आणि हेल्दी हार्मोन्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा करतात. तसेच आसा नावाचे शेवाळे ही ती लोक खातात. त्यामध्ये आयोडीन, अँन्टीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. हे त्या लोकांच्या कोशिका हेल्दी ठेवण्यास फायदेशीर ठरते.
मॅगवोर्टच्या झाडाच्या पानांची चव ही कडू असते. मात्र त्याचे सेवन केल्याने पचनास मदत होते. ओकिनावा टोफू मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जे कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यासाठी कामी येते.
हेही वाचा- गूळ खाण्याचे 5 जबरदस्त फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क!