Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health मधुमेह ते गॅस्ट्रिकच्या समस्येसाठी 'या' कुकिंग ऑइलचा करा वापर

मधुमेह ते गॅस्ट्रिकच्या समस्येसाठी ‘या’ कुकिंग ऑइलचा करा वापर

Subscribe

जेवण बनवण्यासाठी आपण जे तेल वापरतो त्याबद्दल जागृक राहणे फार महत्त्वाचे आहे. शिल्लक राहिलेल्या कुकिंग ऑइलचा पुन्हा वापर करत असाल तर सतर्क रहा. त्याचसोबत रिफाइंड ऑइल, राइस ब्रेन ऑइल आणि ऑलिव ऑइलला हेल्दी समजून वापर केला जातो. जेणेकरुन आपण आजारांपासून दूर राहता येईल. मात्र आयुर्वेदात हेल्दी राहण्यासाठी आजारांनुसार कुकिंग ऑइलचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच मधुमेह ते गॅस्ट्रिकच्या समस्येवर पुढील काही कुकिंग ऑइलचा वापर करू शकता.

शेंगदाण्याच्या तेलाचा वापर

- Advertisement -


शेंगदाण्याच्या तेलामुळे वात वाढला जातो. त्यामुळे पचनक्रिया बिघडते. तर पीनट ऑइलला कुकिंग ऑइलच्या रुपात वापर करु नये. जर पचनक्रिया व्यवस्थितीत असेल तर शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू शकतो.

राईचे तेल

- Advertisement -


राईच्या तेलाचे हिटिंग तापमान अधिक असते. त्यामुळे राईच्या तेलाचे तेल सोरायसिस, एक्जिमा आणि त्वचेसंबंधित आजार असेल तर ते खाऊ नये. मात्र मधुमेहाच्या रुग्णासाठी राईले तेल फायदेशीर असते.

नारळाचे तेल


ज्या लोकांना थकवा लवकर येतो त्यांनी नारळाच्या तेलाचा वापर कुकिंग ऑइलसाठी करू शकतो. गॅस आणि छातीत जळजळची समस्या असेल तर नारळाचे तेल कुकिंग ऑइलच्या रुपात वापरु शकतो. ज्या लोकांना वजन कमी करायचे असेल तर नारळाचे तेल वापरू नये. कारण यामध्ये फॅट अधिक प्रमाणात असते.

तिळाचे तेल


ज्या लोकांमध्ये न्युट्रिशिनची कमतरता असते आणि शरिरात सहज न्युट्रिशन शोषले जात नाहीत त्यांनी जेवण्यासाठी तिळाचे तेल वापरावे. यामुळे शरिरात अग्निचे प्रमाण वाढले जाते.

शुद्ध तूप


शुद्ध तूप हे कुकिंगसाठी उत्तम असते. ते पचनासाठी आणि रक्त तयार करण्यासाठी मदत करते. परंतु अपचन आणि यकृतासंबंधितची समस्या असेल तर शुद्ध तूपाचा वापर अजिबात करू नका.


हेही वाचा- ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये तुपाचे सेवन

 

- Advertisment -

Manini