Saturday, April 20, 2024
घरमानिनीKitchenवापरलेले तेल पुन्हा वापरणे योग्य की अयोग्य?

वापरलेले तेल पुन्हा वापरणे योग्य की अयोग्य?

Subscribe

तळलेले पदार्थ कोणाला आवडत नाही. कढईत खुप तेल आणि त्यामध्ये तळले जाणारे पदार्थ फार आवडीने खाल्ले जातात. परंतु तळलेले पदार्थ बनवून झाल्यानंतर उरलेल्या तेलाचे काय करायचे असा प्रश्न पडतो. परंतु काही वेळेस तेच तेल भाजी, कढी बनवण्यासाठी वापरतात. मात्र असे करणे फार चुकीचे आहे. तळल्यानंतर राहिलेले तेल पुन्हा वापरले की, आरोग्य बिघडू शकते. (Cooking oil reuse tips)

पुन्हा वापर करण्याचे नुकसान
काही शोध असे सांगतात की, वारंवार एकाच तेलाचा वापर केला की, आपल्या शरिरात अधिक फ्री रेडिकल्स बनू लागतात. जे आपल्या शरिरात इंफ्लेमेटरी डिसऑर्डर, हृदयासंबंधित समस्या आणि ऐवढेच नव्हे तर कॅन्सर सारखे गंभीर आजार उद्भवतात.

- Advertisement -

प्रत्येक तेलाचे आपला एक स्मोकिंग पॉइंट असतो. म्हणजेच असा पॉइंट ज्या प्रकारे तेल अधिक गरम केल्यानंतर खराब होते. जेवढा अधिक स्मोकिंग पॉइंट असेल तेल तेवढे अधिक वेळा वापरता येते. परंतु लो स्मोकिंक पॉइंट असणारे तेल पुन्हा वापरले जाऊ शकत नाही.रिफाइंड ऑइलच्या तुलनेत व्हेजिटेबल ऑइलचा स्मोकिंग पॉइंट अधिक असतो. परंतु तेलालाल त्याच्या स्मोकिंग पॉइंट पेक्षा अधिक गरम करणे हानिकारक मानले जाते. कारण असे केल्याने तेल ऑक्सिडाइज होऊन फ्री रॅडिकल्स आणि 4 हाइड्रॉक्सी-2 नॉनएनजल सारखे कंम्पाउंड्स रीलिज करतात. (Cooking oil reuse tips)

- Advertisement -

फ्री रॅडिकल्स त्वचेला वेळेआधीच वृद्ध करतात. त्यामुळे आपल्या त्वचेवक सुरकुत्या, डाग येतात. फ्री रॅडिकल्स वाढत्या वयासह अल्जाइमर आणि पार्किंसन सारख्या गंभीर आजारांना जन्म देतात. त्यामुळेच भले फ्राइड ऑइलचा पुन्हा वापर करणे तुम्हाला योग्य वाटत असेल पण भविष्यात यामुळे काही गंभीर समस्या उद्भवू शकतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा तुम्ही तळलेले पदार्थ बनवणार असाल तेव्हा सुरुवातीलाच कमी तेल वापरा. जेणेकरुन नंतर लागल्यास तुम्हाला ते पुन्हा टाकता येईल. मात्र आधीच अधिक तेल घेतल्यास तर ते तेल वापरणे म्हणजे आरोग्यासंदर्भात रिस्क घेण्यासारखेच आहे.

कोणत्या तेलांचा वापर कराल?
राई, राइस ब्रेन, तिळ किंवा सनफ्लॉवर सारख्या उच्च स्मोक पॉइंट असणाऱ्या तेलांचा तुम्ही पुन्हा वापर करु शकता. परंतु तज्ञांनुसार नेहमीच लक्षात ठेवा की, तेल हे कधीच दोन वेळा पेक्षा अधिक वापरु नका. ऑलिव्ह ऑइल सारखे लो स्मोक पॉइंट असणारे तेल सुद्धा पुन्हा वापरु नका. ना ते अधिक गरम करावे.

- Advertisment -

Manini