Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीCooking Tips : उकळलेल्या पाण्यात अंडी फुटतात? वापरा या ट्रिक्स

Cooking Tips : उकळलेल्या पाण्यात अंडी फुटतात? वापरा या ट्रिक्स

Subscribe

अंड खाणे शरीरासाठी लाभदायक असते, त्यामुळे सकाळच्या नाष्टात हमखास उकडलेली अंडी खाल्ली जातात. पण, अनेक स्त्रियांची अशी तक्रार असते की, अंडी उकडताना पाण्यातच ती फुटतात अथवा त्यामध्ये भेगा पडतात. इतकच नाही तर अंडी सोलतानाही फुटतात. ज्यामुळे अंड्याचे पदार्थ व्यवस्थितपणे बनवता येत नाही. त्यामुळेच आज आम्ही उकळलेल्या पाण्यात अंडी फुटण्याच्या तकारीवर काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे अंडी फुटणार नाहीत.

  • सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. अंडी उकळण्यासाठी भांड्यात अंडी बुडतील याची खात्री करावी. या टिपमुळे अंडी एकमेकांना लागत नाही आणि फुटतही नाही.
  • भांड्यातील पाणी उकळल्यावर त्यात अर्धा चमचा मीठ घाला आणि त्यानंतरच त्यात अंडी उकडण्यास ठेवावीत.
  • अंडी उकडताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवू नये, मध्यमच ठेवावी.
  • किमान 15 मिनिटेतरी अंड पाण्यात उकळवून घ्यावीत. या टिपमुळे अंडी पाण्यात फुटणार नाहीत.
  • काहींना फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याची सवय असते. फ्रिजमधील अंडी थेट पाण्यात घातल्याने ती फुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अंडी उकळताना थेट फ्रीजमधून काढून त्यांना उकडण्यास ठेवू नका. केव्हाही अंडी उकडताना अर्धा तास आधी फ्रीजमधून काढून मगच उकडावीत.
  • भांड्यात जास्त अंडी एकसाथ उकडण्यास ठेवू नका. यामुळे अंडी एकमेकांवर आदळतात आणि फुटतात. त्यामुळे जरी लहान भांडे वापरत असाल 3 ते 4 अंड्यापेक्षा जास्त अंडी एकदाच उकडवू नका.
  • अंडी फुटण्यापासून थांबवण्यासाठी व्हिनेगरचा वापर करावा. फक्त व्हिनेगर वापरताना एक अंड्यास एक चमचा व्हिनेगर हे प्रमाण लक्षात ठेवा. व्हिनेगर तुम्हाला अंड्याच्या कवचाला लावायचे आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे अंडी उकडवून घ्यायची आहेत.
  • सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे गरम पाण्यातून अंडी बाहेर काढल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्याशिवाय त्याचे कवच काढू नयेत.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini