घरलाईफस्टाईलजेवणात मीठ, मसाला जास्त झालायं! 'हे' उपाय करा

जेवणात मीठ, मसाला जास्त झालायं! ‘हे’ उपाय करा

Subscribe

भारतीय संस्कृतीत जेवण बनवणे ही एक उत्तम कला मानली जाते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या रंगाचे उत्तम चवीचे पदार्थ चायला मिळतात. मीठ, मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीत अत्यावश्यक घटक आहेत. यामुळे जेवणाला लज्जतदार चव, गंध, आणि रंग येतो. परंतु अनेकदा जेवण बनवताना अंदाज चुकला की मीठ किंवा मसाला जास्त पडतं आणि पदार्थ फसला जातो. त्यामुळे आता काय करावं अशी काळजी वाटू लागते. परंतु आज आपण अशात काही सोपे उपाय पाहणार आहोत जे करुन पटकन पदार्थ चविष्ट करता येऊ शकतो.

 

- Advertisement -

दुध आणि दही

अनेकदा जेवण बनवताना वरण किंवा एखाद्या भाजीत तिखट मसाला जास्त पडतो. अशावेळी तुम्ही तिखटपणा कमी करण्यासाठी भाजीत दूध किंवा दह्याचा वापर करु शकता. त्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होईलचं व भाजीला ग्रेव्हीसारखा टेक्सचर येईल. तसेच बटाट्याचे काप भाजीत घातल्याने देखील तिखटपणा कमी होतो.

साखर आणि मध

आदल्या दिवशीच्या पदार्थात अधिक मसाला पडतो आणि दुसऱ्या दिवशी आठवत नाही की ह्यात कोणता मसाला अधिक प्रमाणात पडला असेल. अशावेळी आपण पदार्थात थोड्याप्रमाणात साखर किंवा मधाचा वापर करुन पदार्थातील तिखटपणा कमी करु शकतो. परंतु हे करण्याआधी एका गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे साखर किंवा मधाचा वापर कमी प्रमाणातच करा. नाहीतर तिखट पदार्थ अधिकचं गोड होईल.

- Advertisement -

 

शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स

ज्यावेळी एखाद्या भाजीमध्ये मीठ, मसाला दोघांचे प्रमाण जास्त होते. त्यावेळी आपण शेंगदाण्याचे कुट किंवा ड्रायफ्रुट्सची पोस्ट वापरुन जेवण चवीष्ट करु शकता. तसेच खारट मसालेदार भाजीत नट बटर मिक्स करुन भाजी रुचकर करु शकता. परंतु ज्या भाज्यांमध्ये नट पेस्ट टाकून चांगली लागेल अशाच भाजांमध्ये वापरा.

 

लिंबाचा रस

एखादा पदार्थ बनवताना मीठ जास्त झाल्यास आपण गोंधळून जातो. पण अशावेळी खारट झालेल्या पदार्थात लिंबाचा रस वापरु शकता. कारण लिंबाचा रस खारट पदार्थातील मीठ कमी करण्यास फायदेशीर ठरते.

 

अंडे

एखाद्या भाजीत मीठ, मसाला, मिरची पावडर जास्त झाल्यास त्यात तुम्ही अंड्यातील पांढरा भाग मिक्स करु शकता. कारण अंड्यातील पांढरा भागामुळे पदार्थातील खारटपणा, तिखटपणा कमी होऊ शकतो. कच्चे अंडे भाजीत फोडून टाकण्याऐवजी अंडे उकळून घ्या. आणि त्यातील पिवळा बलकचं फक्त भाजीच्या गेव्र्हीमध्ये मिक्स करा. कारण पूर्ण उकळलेलं अंड मिक्स केल्याने ग्रेव्हीची टेस्ट खराब होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -